चिमुकल्याला शिकण्यासाठी 2 कोटी पगार
केवळ 1 वर्षाचे मूल
एक वर्षाच्या मूलाला शिकविणे आणि पद्धती शिकविण्याच्या बदल्यात 1 लाख 80 हजार पाउंड म्हणजेच 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक वेतनाच्या नोकरीची ऑफर एका ट्यूटरसाठी देण्यात आली आहे. इंग्लंडमधील एका धनाढ्या आईवडिलांनी स्वतच्या मुलाच्या ट्यूटरसाठी इतक्या अधिक पगाराची जाहिरात प्रकाशित केली आहे. एका महिलेने मम्सनेटवर पर्सनल ट्यूटरच्या जॉबची एक जाहिरात शेअर करत याच्या अटी आणि वेतनाशी निगडित गोष्टी शेअर केल्या आहेत. मम्सनेट योग्य लोकांसोबत टीचिंगशी निगडित नोकऱ्यांवर केंद्रीत एक प्लॅटफॉर्म आहे.
या जाहिरातीत एका अशा नोकरीवरुन माहिती देण्यात आली होती, ज्यात एका वर्षाच्या मुलासाठी खासगी शिक्षकाची आवश्यकता एका परिवाराला होती. त्या ट्यूटरचे वार्षिक वेतन 1 लाख 80 हजार पाउंड होते. या जाहिरातीला शेअर करणारी महिला शिक्षकाच्या पात्रतेच्या अटी आणि मिळणाऱ्या सुविधा पाहून दंग झाली. मम्सनेटने एक ड्रीम जॉबसोबत एक लिंक पोस्ट केली होती. याचमुळे मी त्यावर क्लिक केले आणि अविश्वसनीय वेतन पाहिल्यावर मी पुढील मजकूर वाचू लागले. हा प्रकार एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे, ज्यात मुलांना तयार केले जाते आणि त्यांना एका निश्चित डिझाइनमध्ये घडविले जाते. मुलांना मुलांप्रमाणे का राहू दिले जात नाही आणि त्यांना सहकाय आणि संधी देण्यात यावी, त्यांना स्वत:चा मार्ग स्वत: निवडू द्यावा असे एका महिलेने मम्सनेटवरील जाहिरातीप्रकरणी म्हटले आहे.
इंंग्लिश जंटलमॅन
ही नोकरीची जाहिरात उत्तर लंडनच्या एका परिवारासाठी होती. हा परिवार स्वत:च्या एक वर्षीय मुलाला ‘इंग्लिश जंटलमॅन’ करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या शोधात होता. या भूमिकेसाठी अत्यंत उच्चशिक्षित इसमाची गरज आहे, यामुळे नॅनी आणि आयांचा विचार केला जाणार नसल्याचे जाहिरातीत नमूद आहे. मुलाला कुठलाही सांस्कृतिक पूर्वाग्रह वरचढ ठरण्यापूर्वी ब्रिटिश संस्कृती, मूल्ये आणि सुक्ष्मतांशी परिचित करविण्यात यावे यावर ही भूमिका केंद्रीत असल्याचे जाहिरातीत म्हटले गेले आहे. याचा उद्देश एक वर्षाच्या मुलाची जन्मजात जिज्ञासा आणि आत्मसात करण्याच्या क्षमतेचा वापर करणे आहे तसेच त्याला जे काही शिकविले जाईल ते उच्चदर्जाचे असेल हे सुनिश्चित करणे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुलाचा परिवार बहुभाषिक
जाहिरातीत ‘विद्यार्थी’ (एक वर्षाचे मूल) विषयी तो एका बहुभाषिक परिवारातील असून ते आता त्याला शिक्षित करू इच्छितात, कारण त्यांनी त्याच्या मोठ्या भावासाठी अत्यंत मोठी प्रतीक्षा केली असल्याचे म्हटले गेले आहे. या मुलाच्या मोठ्या भावासोबत वयाच्या 5 व्या वर्षी सुरुवा केल्यावर स्वत:चे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी अत्यंत विलंब झाल्याचे त्यांना वाटले, याचमुळे ते आता एका शिक्षकाचा शोध घेत आहेत. कमी वयात कुठलाही सांस्कृतिक पूर्वग्रह विकसित होत नाही, याचमुळे त्याला दुहेरी संस्कृतीवादाच्या मार्गावर नेणाऱ्या घडामोडी आणि ज्ञानाशी ओळख करून देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे परिवाराचे मानणे आहे.
अर्ज करण्यासाठी अटी
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या लोकांना आवश्यक पात्रतेची एक मोठी यादी देण्यात आली आहे. आदर्श शिक्षकाकडे व्यापक शब्दावली असाव्यात, तसेच तो शब्दांचा योग्य उच्चार करणारा असावा. याचबरोबर शिक्षकाला अन्य भाषेसह संगीताची चांगली जाण असावी आणि विशेषकरून ब्रिटिश अनुभवांची समज असावी. लॉर्ड्स संग्रहालय, थिएटर, विंब्लडन आणि ट्विकेनहॅमच्या यात्रेसह पोलो आणि नौकानयनचे शिक्षण अपेक्षित आहे.
अनेक सुविधा मिळणार
मुलाला ईटन, सेंट पॉल्स, वेस्टमिंस्टर किंवा हॅरो यासारख्या प्रतिष्ठित शाळेत प्रवेश मिळू शकेल या अपेक्षेने हे करण्यात येत आहे. नोकरीच्या जाहिरातीत 1,80,000 पाउंडचे मोठे वेतन, वर्षात 4 आठवड्यांची सुटी आणि भ्रमणासाठी एक कार आणि चालकाची सुविधा देण्यात येणार आहे.