महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑगस्टमध्ये दंडासह 2 कोटी 87 लाख कर जमा

06:49 AM Sep 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महानगरपालिकेची कर जमा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगाव महानगरपालिकेला कर जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. चलन व ऑनलाईनद्वारे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे. एप्रिल 1 पासून आतापर्यंत 46 कोटी 74 लाख 41 हजार 590 रुपये जमा करण्यात आले आहेत. 1 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत 2 कोटी 87 लाख 77 हजार 767 रुपये 2 टक्के दंडासह जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती महसूल विभागातून देण्यात आली.

एप्रिलपासून महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाला सुरुवात होते. एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टी किंवा इतर कर भरणाऱ्यांना 5 टक्के सवलत दिली जाते. मात्र यावर्षी सुरुवातीलाच सर्व्हरडाऊन समस्येमुळे या सवलतीपासून अनेकांना वंचित रहावे लागले होते. त्याचबरोबर लोकसभेची निवडणूकही त्याकाळातच झाली. त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये गुंतले होते. परिणामी केवळ पंधराच दिवस सवलतीमध्ये कर भरण्यासाठी मिळाले होते.

याबाबत राज्याच्या नगरविकास खात्याकडे महानगरपालिका व काही संघटनांनी सवलत देण्यासाठी मुदतवाढ करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे जून महिन्यामध्ये पुन्हा 5 टक्के सवलत महिन्याभरासाठी देण्यात आली होती. त्यानंतर जुलैमध्ये विनादंड कर आकारला गेला. तर ऑगस्टमध्ये 2 टक्के दंडासह कर आकारणी करण्यात आली आहे. मात्र नगरविकास खात्याने पुन्हा 14 सप्टेंबरपर्यंत 5 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले. यामुळे बेळगाववासियांना दिलासा मिळाला आहे.

महानगरपालिकेला 29 ऑगस्टला हा आदेश मिळाला. त्यानंतर आता 14 सप्टेंबरपर्यंत 5 टक्के सवलत देऊनच कर आकारला जाणार आहे. नगरविकास खात्याने आदेश काढताना त्यामध्ये मध्यंतरी विनासवलत कर भरला आहे त्यांना पुन्हा सुट देणार की पुढीलवर्षी सुट देणार, याचा उल्लेख आदेशात केला नसल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे. त्यामुळे काही जणांना दिलासा तर काही जणांना फटका बसला आहे.

महानगरपालिकेला 2024-25 वर्षासाठी 73 कोटी कर जमा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. एप्रिलपासून मार्चपर्यंत ही रक्कम जमा करावी लागणार आहे. आतापर्यंत 46 कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. उर्वरित सात महिन्यांमध्ये 27 कोटी रक्कम जमा करावी लागणार आहे. आता 15 दिवस कर भरण्यासाठी 5 टक्के सवलत दिल्यामुळे निश्चितच हे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article