For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशातील 2.30 लाख ‘एक्स’ खाती बंद

06:21 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशातील 2 30 लाख ‘एक्स’ खाती बंद
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

एलॉन मस्क यांच्या ‘एक्स कॉर्प’ कंपनीने 26 एप्रिल ते 25 मे दरम्यान भारतातील 2 लाख 30 हजार 892 खात्यांवर बंदी घातली आहे. यापैकी 2 लाख 29 हजार 925 खात्यांवर मुलांचे लैंगिक शोषण आणि संमती नसलेल्या अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आली आहे. तर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली 967 खाती काढून टाकण्यात आली आहेत. नवीन आयटी नियम 2021 नुसार आपल्या मासिक अहवालात कंपनीकडून ही माहिती देण्यात आली आहे.

‘एक्स कॉर्प’ला 26 एप्रिल ते 25 मे दरम्यान भारतातील वापरकर्त्यांकडून 17,580 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींना अनुसरून कंपनीने खाते निलंबनाविरोधात 76 तक्रारींवरही कारवाई केली. यापूर्वी, 26 मार्च ते 25 एप्रिल दरम्यान ‘एक्स’ने भारतात 1 लाख 84 हजार 241 खात्यांवर बंदी घातली होती. यामध्ये 1 हजार 303 खाती दहशतवादाला प्रोत्साहन दिल्यामुळे बंद केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.