Sangli : सांगलीत अतिवृष्टीसाठी 150 कोटी आले पण खात्यावर दमडीही नाही
सांगलीत अतिवृष्टी-पुर नुकसान भरपाई वितरणात विलंब
सांगली : जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठासह दुष्काळीपट्ट्यातील बागायती आणि फळपिकांच प्रचंड नुकसान झाले होते. संकटात सापडलेल्या सुमारे दीड लाखांवर शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने १४९ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र अद्याप शेतकयाच्या खात्यावर जमा झाली नाही. दिवाळी गेली तरीही भरपाई रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदयांना आलेल्या पुराचे पाणी शेतातील पिकांत थांबून राहिल्याने मोठे नुकसान झाले होते. भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सप्टेंबर महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती.
पश्चिम भागासह दुष्काळी तालुक्यात दाणादाण झाली. डाळींब, द्राक्ष, तूर, उडीद, मका, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. शासनाने अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मदत जाहीर केली आहे.
तीन हेक्टरच्या मयवित वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये फळपिकांसाठी हेक्टरी २२ हजार ५००, बागायतीसाठी १७हजार तर जिरायतीसाठी हेक्टरी आठ हजार मदत देण्याचे जाहीर केले होते. जिल्ह्यासाठी १४९ कोटी ९५ लाखांची भरपाईची मदत मंजूर झाली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र निधी वेळेत आला नाही. शिवाय बँकांना दिवाळीची सुटटी असल्याने विलंब झाला.
जिल्ह्यासाठी आवश्यक सुमारे १५० कोटी निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून त्याचे वितरण तालुका स्तरावरून सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप जिल्हयातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईचा दमडीही जमा झाला नसल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत असून भरपाई जमा नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.