For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime : डबल मर्डरने सांगली शहर हादरले

04:40 PM Nov 12, 2025 IST | NEETA POTDAR
sangli crime   डबल मर्डरने सांगली शहर हादरले
Advertisement

                         सांगलीत डबल मर्डर; दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते ठार

Advertisement

सांगली : सांगली येथील दलित महासंघाचा नेता आणि यंदाच्या वर्षीच्या अण्णाभाऊ साठे जयंती समितीचा अध्यक्ष उत्तम मोहिते आणि त्याच्यावर हल्ला करणारा शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याचा मोहितेच्या गारपीर येथील घराजवळच खून झाला. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे मंगळवारी उत्तमचा वाढदिवस होता आणि दारात त्याच्या सत्कारासाठी स्टेज घालण्यात आला होता.

रात्री साडेदहा ते अकरापर्यंत मोहिते याच्या दारात डॉल्बीचा दणदणाट सुरू होता. तो अकरा वाजता थांबला त्याचवेळी त्याचा खून झाला. प्राथमिक माहितीनुसार खून करणाऱ्या शेख याच्यावर उत्तमच्या पुतण्याने पलटवार केल्याने शेख याचाही जागेवरच मृत्यू झाला आणि डबल मर्डरने सांगली हादरली. हा खून पूर्व वैमनस्यातून की सुपारी देऊन झाला याबद्दल चर्चा सुरू असून पोलिसांकडून मात्र काहीही जाहीर सांगण्यात आलेले नाही.

Advertisement

. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री अकराच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल जवळील गारपीर येथे राहत्या घराजवळ तेथून जवळच असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टी मधील संशयिताने त्याच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला केला. त्याने सर्वप्रथम उत्तम याच्या डोक्यात एडक्याचा घाव घातला आणि त्यानंतर पोटावर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

या दरम्यान उत्तम च्या पुतण्याने हल्लेखोरावर पलटवार केला. त्यात हल्लेखोर शेख याचाही मृत्यू झाला असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. मात्र त्याची ओळख उपस्थित व्यक्तींना नसल्याचे समजते. नंतर पोलिसांनी त्याची माहिती मिळवून वेळाने पोलिसांना याची माहिती मिळाली मात्र त्यांच्याकडून पत्रकारांना कोणतीही माहिती सांगण्यात आली नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आपल्या आक्रमक आंदोलनाने आणि वचक ठेवण्याच्या राजकारणाने अल्पावधीतच उत्तम मोहिते आणि त्याच्या साथीदारांचा दबदबा निर्माण झाला होता. पूर्वीच्या काही गुन्हेगारी कारणामुळे त्यांच्यावर हद्दपारची कारवाईही झाली होती. त्यानंतर त्याने - दलित महासंघाचे मोठी संघटना बांधून जिल्हाभर - आपले जाळे विणले होते. यातून त्याने अनेकांशी - वैरही घेतले होते.

-

Advertisement
Tags :

.