For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदी, शहांसह 195 उमेदवार जाहीर

06:58 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदी  शहांसह 195 उमेदवार जाहीर
Advertisement

भाजपची पहिली यादी घोषित : 34 केंद्रीय मंत्र्यांसह 28 महिलांना स्थान :महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार या राज्यांची अजूनही प्रतीक्षा

Advertisement

उमेदवार निवडीत सर्व समाजघटकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न195 candidates announced including Modi, Shah

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची नावे असलेली प्रथम सूची घोषित केली आहे. या सूचीत 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांचा समावेश आहे. अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रथम सूचीत 34 केंद्रीय मंत्र्यांसह 28 महिलांना स्थान देण्यात आले आहे. सर्व समाजघटकांना प्राधान्य देताना या सूचीत अन्य मागासवर्गीय समाजांमधील 57, अनुसूचित जातींमधील 27 तर अनुसूचित जमातींमधील 18 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. अनेक नव्या चेहऱ्यांसाही समावेश करण्यात आला असून, युवकांनाही मोठे महत्व दिले गेले आहे, असे दिसून येत आहे.

प्रथम सूची घोषित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून दिल्लीत शनिवारी एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांनी या पत्रकार परिषदेत सर्व उमेदवारांची नावे आणि त्यांचे राज्यनिहाय मतदारसंघ यांचे वाचन केले. मात्र, पहिल्या यादीत महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार या मोठ्या राज्यांची अजूनही प्रतीक्षा असल्याचे स्पष्ट करतानाच उर्वरित राज्यांमधील उमेदवारही लवकरच जाहीर केले जातील, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

16 राज्ये, 2 केंद्रशासित प्रदेश

या सूचीत देशातील 16 राज्ये आणि 2 केंदशासित प्रदेश यांच्यातील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. राज्यांचा विचार करता उत्तर प्रदेशातील 80 पैकी 51, पश्चिम बंगालमधील 42 पैकी 26, मध्यप्रदेशातील 29 पैकी 24, गुजरातमधील 26 पैकी 15, राजस्थानमधील 25 पैकी 15, केरळमधील 20 पैकी 12, तेलंगणातील 17 पैकी 9, आसाममधील 14 पैकी 11, झारखंडमधील 14 पैकी 11, छत्तीसगडमधील सर्व 11, दिल्लीतील 7 पैकी 5, जम्मू-काश्मीरमधील 5 पैकी 2, उत्तराखंडमधील 5 पैकी 3, तर अरुणाचल प्रदेश, गोवा आणि त्रिपुरा यांच्यातील प्रत्येकी 2 पैकी प्रत्येकी 1 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. अंदमान-निकोबार आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येकी 1 उमेदवारांचे नावही घोषित करण्यात आले आहे.

महिला, युवकांनाही संधी

या सूचीत भारतीय जनता पक्षाने महिला आणि युवक यांनाही महत्व दिल्याचे दिसून येत आहे. 195 उमेदवारांमध्ये 28 महिला आणि 50 वर्षांहून कमी वय असलेल्या 47 युवा उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीतील अनेकांची नावे वगळण्यात आली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेल्याचे दिसून येते. अनेक मंत्र्यांना त्यांचे नेहमीचे मतदारसंघ देण्यात आले आहेत.

उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर गोव्यात विजयी झालेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळीही त्याच मतदारसंघातून पुन्हा संधी देण्यात आली आहे. दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज, तसेच अरुणालच प्रदेशातून केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हे उमेदवार असतील. हेमा मालिनी यांना मथुरामधून पुन्हा संधी देण्यात आली आहे.

काही राज्ये आणि उमेदवार

अंदमान-निकोबार

विष्णू पद रे

अरुणाचल प्रदेश

किरण रिजीजू (अरुणाचल पश्चिम), तापीर गाओ (अरुणाचल पूर्व)

आसाम

कृपानाथ मल्लाह (करीमगंज), परिमल शुक्लवैद्य (सिलचर), अमरसिंग तिस्मो (स्वायत्त जिल्हा), बिजुली मेधी (गुवाहाटी), दिलीप सैकिया (मंगलदोई), रणजीत दत्ता (तेजपूर), सुरेश बोरा (नौगाव), कामाख्या प्रसाद तासा (कलियाबोर), तोपोन कुमार गोगोई (जोरहाट), सर्वानंद सोनोवाल (दिब्रुगढ), प्रधान बारुआ (लखीमपूर)

छत्तीसगड

चिंतामणी महाराज (सरगुजा), राधेश्याम राठिया (रायगढ), श्रीमती कमलेश जांगडे (जांजगीर चंपा), सरोज पांडे (कोरबा), तोखन साहू (बिलासपूर), संतोष पांडे (राजनंदगाव), विजय बघेल (दुर्ग), वृजमोहन अग्रवाल (रायपूर), रुपकुमारी चौधरी (महासमुंद), महेश काश्यप (बस्तर), भोजराज नाग (कांकेर)

दिल्ली

प्रवीण खंडेलवाल (चांदणी चौक), मनोज तिवारी (ईशान्य दिल्ली), बांसुरी स्वराज (नवी दिल्ली), कवलजीत सहरावत (पश्चिम दिल्ली), रामवीर सिंग बिधुडी (दक्षिण दिल्ली)

गुजरात

विनोद लखमाशी (कच्छ), रेखाबेन चौधरी (बनासकाठा), भरतसिंह दाभी (पाटण), अमित शाह (गांधीनगर), दिनेश मकवाना (अहमदाबाद), पुरुषोत्तम रुपाला (राजकोट), मनसुख मांडविया (पोरबंदर), पूनमबेन माईम (जामनगर), मितेश पटेल (आणंद), देवूसिंग चौहान (खेडा), राजपाल जाधव (पंचमहाल), जसवंत भाभोर (दाहोद), मनसुख वसावा (भडोच), प्रभू वसावा (बारडोली), चंद्रकांत पाटील (नवसारी)

उत्तर प्रदेश

प्रदीप कुमार (कैराणा), संजीव बालियान (मुझफ्फरनगर), ओम कुमार (नगीना), घन:श्याम लोधी (रामपूर), परमेश्वर सैनी (संमल), शंकर तत्वर (अमरोहा), महेश शर्मा (गौतमबुद्ध नगर), भोला सिंग (बुलंदशहर), हेमा मालिनी (मथुरा), सत्यपाल बघेल (आग्रा), राजकुमार चाहर (फतेपूर सिक्री), राजवीर सिंग (एटा), धर्मेंद्र काश्यप (आंवला), अरुण कुभार सागर (शहाजहानपूर), अजय शर्मा (खिरी), रेखा वर्मा (धौरहरा), राजेश वर्मा (सीतापूर), प्रकाश रावत (हरदोई), अशोक रावत (मिश्रीख), साक्षी महाराज (उन्नाव), कौशल किशोर (मोहनलालगंज), राजनाथसिंग (लखनौ), स्मृती इराणी (अमेठी), संगम गुप्ता (प्रतापगड), मुकेश रजपूत (फारुखाबाद), शंकर कठेरिया (इटावा), सुब्रत पाठक (कन्नौज), देवेंद्रसिंग (अकबरपूर), भानू प्रताप सिंग (जालौन), अनुराग शर्मा (झांशी), पुष्पेंद्र चंदेल (हमीरपूर), आर. के. सिंग (बांदा), निरंजन ज्योती (फतेहपूर), उपेंद्र रावत (बाराबंकी), लल्लू सिंग (फैजाबाद), रितेश पांडे (आंबेडकर नगर), साकेत मिश्रा (श्रावस्ती), कीर्तीवर्धन सिंग (गोंडा), जगदंबिका पाल (डुमरियागंज), हरिश द्विवेदी (बस्ती), प्रवीणकुमार निषाद (संत कबीर नगर), पंकज चौधरी (महाराजगंज), गोरखपूर (रवी किशन), विजय कुमार दुबे (कुशीनगर), कमलेश पासवा (बासगाव), नीलम सोनकर (लालगंज), दीनेशलाल यादव (आझमगढ), रविंद्र कुशवाह (सलेमपूर), कृपाशंकर सिंग (जौनपूर), महेंद्र पांडे (चंदौली)

पश्चिम बंगाल

निशिथ प्रामाणिक (कूचबिहार), मनोज लिग्गा (अलिपूरद्वार), सुकांता मजूमदार (बेलूरघाट), खगेन मुर्मू (मालदा उत्तर), श्रीरुपा चौधरी (मालदा दक्षिण), निर्मल कुमार साहा (बहरामपूर), गौरी शंकर घोष (मुर्शिदाबाद), जगन्नाथ सरकार (राणाघाट), शांतनू ठाकूर (बनगाव), अशोक कंडारी (जॉयनगर), अनिर्बन गांगुली (जाधवपूर), रथिन चक्रवर्ती (हावडा), लॉकेट बॅनर्जी (हुगळी), सौमेंदु अधिकारी (कांथी), हिरण्मय चट्टोपाध्याय (घाटल), ज्योतिर्मयसिंह महतो (पुरुलिया), सुभाष सरकार (बांकुडा), सौमित्र खान (बिष्णूपूर), पवन सिंग (आसनसोल), प्रिया साहा (बोलपूर)

Advertisement
Tags :

.