For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

1600 वर्षे जुन्या आहेत 194 गुहा

06:23 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
1600 वर्षे जुन्या आहेत 194 गुहा
Advertisement

विशाल पर्वतात खोदून झाली होती निर्मिती

Advertisement

मॅजिशान ग्रोटो ही चीनच्या गांसू प्रांतातीलल तियानशुई शहरात मॅजिशान पर्वतात 194 गुहांची एक साखळी आहे. या गुहा 1600 वर्षांपेक्षा अधिक जुन्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या गुहांमध्ये 7,200 हून अधिक दगडी मूर्ती असून 1 हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकारात भित्तिचित्रे दिसून येतात.

या गुहांमध्ये बौद्ध संस्कृती आणि कलेचे अद्भूत दृश्य दिसून येते. तसेच गुहांच्या चहुबाजूला नैसर्गिक सौंदर्य देखील मनमोहक असल्याने या गुहा पाहण्यायोग्य आहेत. या गुहा मॅजी माउंटेन सीनिक रिझर्व्ह क्षेत्राचा हिस्सा आहेत. या माउंटेनची उंची 142 मीटर इतकी असून त्याचे शिखर पाहिल्यास ते गव्हाच्या ढिगाप्रमाणे दिसते. याचमुळे याला ‘व्हीटस्टॅक माउंटेन’ देखील म्हटले जाते. याच मॅजी माउंटेनमध्ये खडकांना कापून या 194 अद्भूत गुहा निर्माण करण्यात आल्या आहेत. या गहा मॅजी पर्वताच्या पायापासून सुमारे 70-80 मीटर अंतरावर आहेत. या गुहांना पाहून इतक्या उंच पर्वतावर त्यांची निर्मिती कशी करण्यात आली  असा प्रश्न उपस्थित होत असतो.

Advertisement

या गुहांची निर्मिती ईसवी सन 384-417 दरम्यान झाली होती आणि याची निर्मिती 12 राजवंशांदरम्यान झाली होती. गुहांचे खोदकाम 1600 वर्षांपेक्षाही पूर्वी उत्तर आणि दक्षिण राजवंशाच्या काळादरम्यान सुरू झाले होते. मॅजिशान ग्रोटो सिल्क रोडच्या प्रसिद्ध ग्रोटोपैकी एक आहे. याला युंगांग ग्रोटो, लाँगमेन ग्रोटो आणि मोगाओ ग्रोटोसोबत चीनच्या 4 प्रमुख ग्रोटोपैकी एक मानले जाते.

Advertisement
Tags :

.