For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईडीचे अधिकारी सांगून 19 लाखांचा घातला गंडा

11:09 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईडीचे अधिकारी सांगून 19 लाखांचा घातला गंडा
Advertisement

गुजरात येथील दोघा लुटेऱ्यांना अटक : सायबर गुन्हा विरोधी विभागाची कारवाई

Advertisement

पणजी : पोलीस खात्याच्या सायबर गुन्हा विरोधी विभागाने केलेल्या कारवाईत मुंबई पोलीस तसेच अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी (ईडी) म्हणून सांगून गोव्यातील उद्योजकांना लाखो ऊपयांना लुटणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्यांमध्ये रवींद्र राजेशभाई नंदानिया (यादव रोड, जिरापा प्लॉट, उपलेटा, राजकोट, गुजरात) विमल मेन्शीभाई डेर (यादव रोड, उपलेटा, राजकोट, गुजरात) यांचा समावेश आहे. संशयित ईडीचे अधिकारी किंवा मुंबई पोलीस अधिकारी म्हणून फोन करायचे. नंतर एक बँक खाते देऊन त्यात रक्कम भरण्याचा आग्रह करीत होते. रक्कम न भरल्यास ईडीची कारवाई सुरु होईल, असे सांगत होते. दोन्ही संशयितांनी मिळून 19 लाख ऊपये उकळले. उपलेटा, राजकोट आणि गुजरातमधून अथक प्रयत्नांनंतर संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून स्मार्टफोन आणि बँक पासबुक्स यांसारख्या अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई उपनिरीक्षक सर्वेश सावंत, कॉन्स्टेबल हेमंत गावकर, सिद्रामय्या मठ यांनी केली आहे. अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक आशिष शिरोडकर आणि निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या देखरेखीखाली त्यांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सायबर फसवणूक करणारे संशयित अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीआयडी) आणि राज्य पोलिस गुन्हे शाखा यासारख्या एजन्सींमधील सरकारी अधिकारी म्हणून तोतयागिरी करतात. अनेकदा फसव्या वेबसाइट्सद्वारे भीती निर्माण करण्यासाठी बनावट कायदेशीर नोटीस देतात. हे घोटाळेबाज खाकी गणवेश परिधान करून स्काईप सारख्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉल करून पीडितांना धमकावतात आणि आपले इप्सित साध्य करतात, असे दिसून आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.