For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन इमारती कोसळून मोरोक्कोत 19 ठार

06:19 AM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
दोन इमारती कोसळून मोरोक्कोत 19 ठार
Advertisement

वृत्तसंस्था/ फेझ

Advertisement

मोरोक्कोच्या सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेल्या फेझ येथे बुधवारी दोन इमारती कोसळल्याने किमान 19 जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य 16 जण जखमी झाले. स्थानिक माध्यमांनुसार सदर इमारती गेल्या काही काळापासून दुर्लक्षित राहिल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास चार मजली इमारती कोसळल्याचे वृत्त फेझ प्रांतातील स्थानिक माध्यमांनी दिले आहे. अल-मुस्तकबाल परिसरात असलेल्या इमारतींमध्ये आठ कुटुंबे राहत होती. दुर्घटनेची माहिती समजताच स्थानिक अधिकारी, सुरक्षा सेवा आणि नागरी संरक्षण पथकांनी घटनास्थळी धाव घेत ताबडतोब शोध आणि बचावकार्य सुरू केले. या दोन्ही कोसळलेल्या इमारतींमध्ये गेल्या काही काळापासून भेगांच्या खुणा दिसत होत्या, परंतु कोणतेही प्रभावी उपाय केले नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे मानले जाते.

Advertisement
Advertisement
Tags :

.