वाहन चोरीचे 19 गुन्हे उघडकीस
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाची मोठी कारवाई
वाहन चोरीचे 19 गुन्हे उघड: सतीश शिंदे पोलीस निरीक्षक
सांगली
वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार दुचाकी वाहन चोरीच्या बाबतीत कारवाई करत असताना, पीएसआय कुमार पाटील व स्टाफ यांना मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी दुचाकीची चोरी केलेला आरोपी आणि रेकॉर्डवरील आरोपी अमोल संभाजी साबळे याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण १९ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. सदरची १९ वाहने पंचनाम्यासाठी सांगलीच्या एलसीबी विभागाने जप्त केली आहेत. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील ५ वाहने तर उर्वरित सांगली जिल्ह्यातील वाहने आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
सदरचा आरोपी गर्दीच्या ठिकाणी, हॉस्पिटल किंवा गर्दीच्या ठिकाणी हेरून, ज्या गाड्यांचे कुलुप खराब आहे अशा गाड्या चोरल्या आहेत अशी कबुली या आरोपीने दिली आहे. तरी सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या दुचाकीचे कुलुप तपासून घ्यावे, नादुरुस्त असल्यास त्याची दुरुस्ती करावी. आणि योग्य ती काळजी घ्यावी. जेणेकरून दुचाकी वाहनांची चोरी होणार नाही. नागरिकांनी सुद्धा सतर्कता बाळगावी, असे आवाहनही यावेळी शिंदे यांनी केले.