कोल्हापुरप्रमाणे राज्यात 30 रुपये
कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळ, वारणा आणि राजारामबापू दूध संघांची गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर 30 रुपये आहे. मात्र राज्यातील इतर खासगी आणि सहकारी दूध संघांतील दर 28 ते 29 रुपये असा होता. यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख दूध संघानी गाय दूध खरेदी दरात वाढ करुन तो सरासरी तीस रुपये केला आहे. यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्रात 30 रुपये दर मिळत असल्याने दरवाढीचा मुद्दाच आला नाही. राज्यातील इतर दूध संघातील ही दरवाढ तत्काळ लागू होणार आहे.
खाजगी व सहकारी दूध संघटनेच्या कोल्हापूर विभागातील डेअरी प्रतिनिधींनी 21 नोव्हेंबर 2024 राजी बैठक घेऊन गाय दूध दरात तब्बल तीन रुपयांची कपात केली होती. दूध भुकटी, लोणी, दुधाचे बाजारातील खरेदी विक्रीत तफावत असल्याने दूध संघांनी हा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र शासनाचा ऑक्टोबर 2024 पासून गाय दूध खरेदीचा 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ करीता किमान प्रतिलिटर दर 28 रुपये आहे.
तसेच संपूर्ण महाराष्ट्रात इतर संघ 27 ते 28 रुपये अशा दराने गाय दूध खरेदी करत होते. फक्त कोल्हापूर जिह्यात 33 रुपये अधिक अंतिम दूध दर फरक असा जवळपास गाय दूध खरेदी दर 6 रुपये जास्त होता. त्यामुळे तो सरासरी 30 रुपये असा करण्यात आला होता.
जिह्यातील गाय दूधाचा दर अधिक असल्याने लोणी, दूध भुकटी याची उत्पादन किमत जास्त येते असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही. तसेच सध्या स्थितीत गाय व म्हैस दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. येथुन पुढे देखील गाय दुधाची उपलब्धता चांगली असेल परंतु, दूध भुकटी व लोण्याच्या विक्री किमतीत कोणतेही वाढ झालेली नाही. त्यामुळे राजारामबापू दूध संघ, गोकुळ दूध संघ, वारणा दूध संघ, भारत डेअरी व इतर दूध संघांनी गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ करीता 33 रुपये ऐवजी 30 रुपये दर देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेतला होता. राज्यातील इतर दूध संघ सरासरी 28 रुपये प्रतिलिटर दूध दर देत असताना पश्चिम महाराष्ट्रात मात्र 30 रूपये दर होता. आता राज्यातील प्रमुख दूध संघ 29 रुपये प्रतिलिटर दूध दर देणार आहेत. तरीही गोकुळ, वारणा आणि राजारामबापू दूध संघासह खासगी दूध संघांचा गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर एक रुपया जास्त असणार आहे.