1800 वर्षे जुना खजिना लागला हाती
बदलले शेतकऱ्याचे नशीब
ब्रिटनच्या केंट काउंटीमध्ये मॅडस्टोननजीक एका शेतजमिनीत 1800 वर्षे जुना खजिना सापडला आहे. 60 वर्षीय स्टीव डीन यांनी स्वत:चे मित्र ग्लेन चर्च आणि एड डेनोवन यांच्यासोबत मिळून हा खजिना शोधला आहे. मेटल डिटेक्टरने शेतजमिनीचे परीक्षण करण्यात आल्यावर हा खजिना सापडला आहे.
तिन्ही मित्र मेटल डिटेक्टरसोबत या शेतजमिनीत फिरत होते, अचानक डिटेक्टरने तीव्र सिग्नल दिला. काहीसे खोदकाम केल्यावर मातीच्या मडक्यात चांदी आणि कांस्याची सुमारे 400 रोमन नाणी मिळाली आहेत. हा खजिना तिसऱ्या आणि चौथ्या शतकातील आहे, त्या काळात ब्रिटन हे रोमन साम्राज्याचा हिस्सा होते. नाण्यांवर सम्राटाचा चेहरा कोरण्यात आलेला आहे. काही नाणी तर अत्यंत दुर्लभ असून या शोधामुळे शेतकरी आणि स्टीव यांचे जीवनच बदलून गेले आहे.
छंदापोटी चमकले नशीब
स्टीव डीनमागील 10 वर्षांपासून मेटल डिटेक्टिंगचा छंद पूर्ण करत आहेत. एका शेतकऱ्याने त्यांना स्वत:च्या शेतजमिनीत शोध घेण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी या ठिकाणी रोमन आर्टिफॅक्ट्स मिळाले होते. यामुळे खजिन्याच्या अपेक्षेने शेतकऱ्याने त्यांना शोध घेण्यास सांगितले होते. सापडलेली बहुतांश नाणी ‘रेडिएट’ आणि ‘न्यूमस’ प्रकारातील असून ती 260-350 काळात वापरात होती. काही नाण्यांवर एम्परर कारॉसियस, टेट्रिकस आणि गॅलियनस यांचे चेहरे आहेत. हा पेंटचा आतापर्यंतचा सर्वात मोठा रोमन कॉइन होर्डपैकी एक असल्याची पुष्टी ब्रिटिश म्युझियमच्या तज्ञांनी दिली.
ब्रिटनमध्ये ट्रेजर लॉ अंतर्गत 10 टक्क्यांपेक्षा अधिक प्रेशियस मेटल किंवा 300 वर्षांपेक्षा अधिक जुनी 2 हून अधिक नाणी मिळाल्यास सरकारला कळविणे आवश्यक आहे. यामुळे स्टीव यांनी त्वरित प्रोटेबल अँटिक्स स्कीमला याची माहिती दिली. आता व्हॅल्यूएशन कमिटी याचे मूल्य निश्चित करणार आहे. यापूर्वी असे होर्ड्स 50 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंत विकले गेले आहेत. या रकमेला शेतकरी आणि शोधकर्त्यांमध्ये विभागण्यात येणार आहे. या भागात यापूर्वीही रोमन इतिहास आणि रस्त्याचे अवशेष मिळाले आहेत.