180 कोटी लोकांना प्रेसबिओपिया
जवळच्या वस्तू दिसतात धूसर
डोळ्यांना जपणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. परंतु सध्या आय कंडियन प्रेसबिओपियाचे प्रमाण वाढले आहे. यात नजीकची दृष्टी कमजोर होत असते. प्रेसबिओपिया एक वयसंबंधी समस्या असून ती सर्वसाधारणपणे 40 वर्षांनंतर होत असते. डोळ्यांच्या लेन्सची इलास्टिसिटी कमी झाल्यावर ही समस्या उद्भवते. यात सुधारासाठी चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स आणि सर्जरी यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. आता मागील काही काळापासून भारतात याच्या उपचाराच्या पर्यायादाखल आय ड्रॉप प्रेस्वूची चर्चा सुरू आहे.
आपण जितक्या लांबच्या गोष्टी पाहतो किंवा वाचतो, त्यानुसार डोळ्यांचा फोकस बदलत असतो. याचा अर्थ डोळ्यांचा लेन्स इलास्टिक असतो, प्रेसबिओपिया झाल्यावर डोळ्यांची फोकस बदलण्याची क्षमता संपुष्टात येते. याच्यामुळे नजीकची दृष्टी कमकुवत होते आणि वाचण्या-लिहिण्यास समस्या होऊ लागते.
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित एका अध्ययनानुसार जगभरात 180 कोटी लोक प्रेसबिओपियाने ग्रस्त आहेत. भारतात हा आकडा अत्यंत अधिक आहे. डाटा ब्रिज मार्केट रिसर्चने 2021 मध्ये प्रेसबिओपियाशी निगडित आकडेवारी जारी केली. यात जगभरात लोक प्रेसबिओपियाने प्रभावित डोळ्यांची तपासणी, करेक्शन, लेन्स आणि औषधांकरता 944.1 कोटी डॉलर्स खर्च करतात असे नमूद आहे. हा खर्च पुढील 7 वर्षांमध्ये 4.90 टक्क्यांची दराने वाढणार असल्याचा अनुमान आहे. याचाच अर्थ प्रेसबिओपियाचे रुग्ण वाढत असल्याने 2029 पर्यंत जगभरातील लोक याकरता 1384 कोटी डॉलर्स खर्च करणार आहेत.
लक्षणे काय
बहुतांश लोकांमध्ये प्रेसबिओपियाचे सर्वात सामान्य लक्षण वयाच्या 40 व्या वर्षाच्या आसपास दिसू लागते. यामुळे वाचणे किंवा जवळून काम करण्याच्या क्षमतेत हळूहळू घट होत जाते. प्रेसबिओपियासाठी कुठल्याही प्रकारचा उपचार नाही. परंतु दृष्टी ठीक करण्यासाठी काही उपचार उपलब्ध आहेत. व्यक्तीचे आरोग्य, त्याचे जीवनमान आणि प्राथमिकतांच्या आधारावर ही स्थिती बरी केली जाऊ शकते.
करेक्शनच्या पद्धती
- योग्य क्षमतेचा चष्मा वापरणे
- डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स घालणे
- डोळ्यांची सर्जरी करवून घेणे
- आय ड्रॉप्सची मदत घेणे