महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘त्या’ कामगाराच्या कुटुंबीयांना 18 लाखांची भरपाई

11:16 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून कामगार खात्याकडे धनादेश सुपूर्द

Advertisement

बेळगाव : नावगे क्रॉस येथील स्नेहम टेपिंग सोल्युशन या कारखान्यातील आग दुर्घटनेत बळी पडलेल्या दुर्दैवी कामगाराच्या कुटुंबीयांना कारखान्याने 18 लाख रुपयांची भरपाई देण्याचे ठरविले आहे. शनिवारी त्या दुर्दैवी तरुणाच्या आई-वडिलांना धनादेश देण्यात येणार आहे. मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी रात्री कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत यलगोंडा सन्नयल्लप्पा गुंड्यागोळ (वय 19, रा. मार्कंडेयनगर) या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह तर मिळाला नाही केवळ अस्थि जमवून प्रशासनाने कुटुंबीयांकडे सोपविले होते. कारखान्याच्या व्यवस्थापनाने कामगार खात्याकडे प्रत्येकी 9 लाखाचे दोन धनादेश सुपूर्द केले असून शनिवारी ते यलगोंडाच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement

आई बसव्वाच्या नावे 9 लाख रुपये व वडील सन्नयल्लाप्पा यांच्या नावे 9 लाख रुपये असे एकूण 18 लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या अस्थि मडक्यात ठेवून एका पिशवीत बांधून देण्यात आल्या होत्या. या विषयावरही प्रशासनावर जोरदार टीका झाली. त्यामुळे स्वत: जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या संपूर्ण आग दुर्घटनेची चौकशी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. कुटुंबीयांनीही भरपाईची मागणी केली होती. कारखाना व्यवस्थापनाने या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना भरपाईदाखल 18 लाख रुपयांचे धनादेश शुक्रवारी कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article