महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोनोलीत 17 तांब्याच्या हंड्यांची चोरी

12:30 PM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चोरट्यांनी केली अनोख्या पद्धतीने चोरी : नागरिकांमध्ये भीती वातावरण 

Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

सोनोली गावात एकाच रात्री तब्बल 17 तांब्याच्या हंड्यांची चोरी करण्यात आली आहे. सदर चोरी सोमवारी रात्री झाली असून मंगळवारी सकाळी चोरी उघडकीस आली.  चोरट्यांनी अनोख्या पद्धतीने चोरी केली आहे. गावातील नागरिकांच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला आंघोळीसाठी म्हणून ठेवण्यात आलेल्या हंड्यांची चोरी केली. या चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडे ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. यापूर्वीही काही गावातील मंदिरांमध्ये तर दिवसाढवळ्या  घरे फोडूनही  चोरी करण्यात आलेली आहे. मात्र चोरट्यांनी आपला मोर्चा तांब्याच्या हंड्याकडे वळविला आहे. या चोरीच्या प्रकाराची दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती.

एका तांब्याच्या हंड्याची किंमत किमान आठ ते दहा हजार ऊपये इतकी असून  जवळपास दीड लाखाचे हंडे चारेट्यांनी लांबविल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अनिल झंगऊचे, रवळू बिजगर्णीकर, अशोक कडोलकर, लता कडोलकर, सुनील झंगरूचे, नारायण पाटील, गावडू पाटील, सोमनाथ कडोलकर, गोपाळ कडोलकर, सुधा यल्लाप्पा कडोलकर, लक्ष्मण कडोलोकर, नेमानी झंगऊचे, मनोहर झंगरूचे, लक्ष्मण झंगऊचे, भरमू पाटील, बसवंत कडोलकर, निंगुली झंगऊचे अशा एकूण 17 जणांच्या घरच्या पाठीमागे ठेवण्यात आलेल्या तांब्याच्या हंड्यांची चोरी करण्यात आली आहे, अशी माहिती काही नागरिकांनी दिली आहे.

गावातील बरेचसे नागरिक रात्री साडे अकरा वाजेपर्यंत जागे होते. त्यानंतर सर्व नागरिक झोपी गेले असता सदर चोरी मध्यरात्री एक ते तीनच्या सुमारास झाली असावी असा अंदाज गावकरी व्यक्त करीत आहेत. मात्र एकाच रात्री इतक्या तांब्याच्या हंड्याची चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी केले कसे अशी ही चर्चा सुरू आहे. आणि त्यांनी हे तांब्याचे हांडे कशा पद्धतीने नेले असावेत किंवा ते नेण्यासाठी कोणत्या वाहनाचा आधार घेतला होता का? अशीही चर्चा सुरू आहे. अन्य काही नागरिकांच्या घराच्या पाठीमागील दरवाजांच्या कडी तोडूनही चोरट्यांनी प्रवेश केला. काही ठिकाणी स्टीलचे हंडे होते. यामुळे ते ते स्टीलचे हंडे चोरट्यांनी चोऊन नेले नाहीत. या चोरीच्या प्रकाराबद्दल मंगळवारी गावातील काही नागरिकांनी वडगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन याबाबतची माहिती दिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article