इस्रायलचे 160 हल्ले, सीरिया सरकार झुकले
वृत्तसंस्था/दमास्कस
दक्षिण सीरियात 5 दिवसांपर्यंत चालले स्वेदा शहरातून सैन्य परत बोलाविण्यासल्या भीषण संघर्षानंतर सीरियाने ड्रूज बहुल सुरुवात केल्याची घोषणा केली. सीरियाच्या अहमद अल-शरा सरकारने ड्रूज नेत्यांसोबत नव्या युद्धविरामावर सहमती दर्शवत तेथील सैन्य अभियान पूर्णपणे थांबणार असल्याचे म्हटले. युद्धविरामाची घोषणा इस्रायलकडून सीरियावर भीषण हवाई हल्ले करण्यात आल्यावर झाली. इस्रायलने ड्रूज अल्पसंख्याकांच्या रक्षणाचे आश्वासन देत सीरियावर 160 हून अधिक हवाई हल्ले केले होते. सांप्रदायिक संघर्षात सामील समूह युद्धविरामाच्या विशिष्ट पावलांवर सहमत झाले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी दिली. तर कराराची प्रथम घोषणा ड्रूज धर्मगुरु शेख युसूफ जेरबुआ यांनी केली होती. याच्या अंतर्गत सीरिया सरकारच्या सैन्याला मागे हटावे लागेल आणि स्थानिक ड्रूज दलांना अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याची अनुमती द्यावी लागणार आहे.
सीरियन सैन्याच्या माघारीला प्रारंभ
कराराच्या अटींच्या अंतर्गत बुधवारी रात्रीपासून सीरियाच्या सैनिकांनी माघार घेण्यास सुरुवात केली. शासनाशी निगडित पोलीस दलांना प्रांतात राहणे आणि स्थानिक ड्रूज सुरक्षा दलांसोबत समन्वय राखण्याची अनुमती देण्यात आली आहे. यापूर्वी 5 दिवसांपर्यंत चाललेल्या संघर्षादरम्यान सीरियाचे सैन्य आणि त्याचे सहकारी बेडौइन सुन्नी मिलिशियावर ड्रूज नागरिकांची हत्या, धार्मिक नेत्यांचा अपमान आणि घरांमध्ये लूट, जाळपोळ केल्याचा आरोप आहे.
स्वेदामध्ये झाली होती हिंसा
बेडौइन सुन्नी मिलिशियाच्या सदस्यांनी स्वेदा शहरातील एका यूवा ड्रूजला लुटल्यावर हिंसेला सुरुवात झाली होती. यानंतर स्थानिक रहिवाशांनी बेडौइन समुदायाच्या अनेक सदस्यांना ताब्यात घेतल्याने तणाव वाढला होता. तर अल-शराचे सैन्य मंगळवारी प्रांतीय राजधानीत शिरले होते. कायदा-सुव्यवस्था सुधारणे हा उद्देश होता असा दावा सैन्याने केला होता. परंतु सैन्यही हिंसेत सामील होत ड्रूज लोकसंख्येवर हल्ले करू लागले होते.