महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

16 वर्षांची मेहनत, 19 हजार पानांचा वापर

06:33 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंकांना शब्दांमध्ये लिहून नोंदविला विक्रम

Advertisement

जो व्यक्ती अशक्य काम करून दाखवितो, त्याचेच नाव इतिहासात नोंद होत असते. अशाप्रकारचे लोकच विश्वविक्रम करत असतात. 1982 मध्ये एका इसमाने अशाच प्रकारची कामगिरी करण्याचा निश्चय केला. ऑस्ट्रेलियातील या इसमाने 16 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर स्वत:च्या नावावर विश्वविक्रम केला. या इसमाने पानांवर क्रमांक लिहिले, परंतु हे क्रमांक लिहिण्यासाठी त्याला 16 वर्षे लागली आहत.

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या मुडजिम्बा येथे राहणारे लेस स्टीवर्ट यांना गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव नोंदविण्यासाठी काहीतरी अनोखे करावे लागेल असे समजले हेते. मग त्यांनी काहीतरी अदभूत करण्याचा निर्णय घेतला. 1982 मध्ये त्यांनी स्वत:च्या टाइपराइटरवर 1 ते 10 लाखपर्यंतचे अंक शब्दांमध्ये लिहिण्याचा निर्णय घेतला. हे कार्य सोपे वाटत असले तरीही जेव्हा तुम्ही लेस यांच्या विक्रमाबद्दल जाणून घ्याल तेव्हा चकित व्हाल.

लेस यांना हे काम पूर्ण करण्यास 16 वर्षांचा कालावधी लागला आहे. त्यांनी 1982 मध्ये हे काम सुरू केले होते आणि 7 डिसेंबर 1998 रोजी हे काम पूर्ण पेल. त्यांनी 1 ते 10 लाखपर्यंतचे अंक शब्दांमध्ये लिहिले, याकरता त्यांनी 19,990 पानांचा वापर केला आणि 7 टाइपरायटरद्वारे हे काम पूर्ण केले. सनशाइन डेलीने त्यांना हे 7 टाइपराइटर पुरविले होते. त्यांनी 1 हजार इंक रिबनचा वापर या टाइपरायटर्ससोबत केला होता. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने स्वत:च्या अधिकृत सोशल मीडिया अकौंटवर या विक्रमाविषयी 2022 मध्ये पोस्ट केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article