सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर आज सुनावणी ; 16 आमदारांच्या अपात्रता याचिकेवर होणार सुनावणी
MLA Disqualification : सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. ठाकरे गटाच्या दोन्ही याचिकांवर आजपासून सर्वोच्च सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा असल्याचा निकाल दिला. याच निकाला विरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधिश धनंजय चंद्रचुड यांच्या त्रिसदस्यसीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रेसंबधित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने सुनावणी घ्यावी. यासाठी ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती.त्यावरती सुध्दा सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर अनेक कायदेशीर प्रश्न तयार झाले आहेत. आज सुप्रीम कोर्टाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आज दोन्ही याचिकांबाबात काय निर्णय होणार याकडे नजरा लागल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्ट डायरेक्शन देते का याकडे लक्ष आहे. तर दुसर म्हणजे निवडणुक आयोगाच्या निकालावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार यावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून आहेत.