For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजदकडून 16 उमेदवारांची घोषणा

06:20 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
संजदकडून 16 उमेदवारांची घोषणा
Advertisement

मुंगेरमध्ये ललन सिंह उमेदवार

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीकरता रालोआत सामील संजदने रविवारी स्वत:च्या उमेदवारांची घोषणा केली आहे. संजदकडून घोषित 16 उमेदवारांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे.  सुनील कुमार यांना वाल्मिकीनगर तर शिवहर येथे लवली आनंद यांना उमेदवारी मिळाली आहे.

Advertisement

सीतामढी येथे देवेशचंद्र ठाकूर, झंझारपूरमध्ये रामप्रीत मंडल, सुपौल येथे दिलेश्वर कामैत, कटिहार येथे दुलालचंद्र गोस्वामी उमेदवार असणार आहेत. तर पूर्णियामध्ये संतोष कुमार, मधेपुरामध्ये दिनेशचंद्र यादव, गोपालगंजमध्ये डॉ. आलोक कुमार सुमन, सिवानमध्ये विजयालक्ष्मी देवी, भागलपूरमध्ये  अजय कुमार मंडल, बांका येथे गिरिधारी यादव, मुंगेरमध्ये राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह, नालंदामध्ये कौशलेंद्र कुमार, जहानाबादमध्ये चंदेश्वर प्रसाद तर किशनगंजमध्ये मुजाहिद आलम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संजदचे उपाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. संजदकडून प्रामुख्याने वर्तमान खासदारांनाच संधी देण्यात आली आहे. केवळ सिवानमधून कविता सिंह, सीतामढी येथे सुनील कुमार पिंटू, गया येथे विजय मांझी आणि काराकट येथे महाबली सिंह यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. संजदच्या उमेदवारांमध्ये 5 अतिमागास, 6 मागास, 3 उच्चवर्णीय, एक दलित आणि एक मुस्लीम सामील आहे.

Advertisement
Tags :

.