ब्रिटीशकालिन तलावात दीडशे वर्षांनी पाणी; कवठे एकंदसाठी रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
तासगाव प्रतिनिधी
कवठेएकंद येथील सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या ब्रिटिश कालीन पाझर तलावात शुक्रवारी अखेर पावसाळ्या व्यतिरिक्त पाणी आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते रोहित आर. आर. पाटील यांनी या कामी केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश आले.त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.
या तलावाच्या दक्षिण बाजूने आरफळ कालवा व उत्तर बाजूने ताकारी योजना जाते मात्र तलावात पाणी सोडण्याची सोय नसल्याने फक्त पावसाळ्यातच तो भरतो. इतर काळात ताकारीचे पाणी देऊन गैरसोय टाळा अशी दहा वर्षे मागणी होती. या परिस्थितीचे गांभीर्य समजून घेऊन गावातील अनिल पाटील यांनी गावातील इतर कार्यकर्त्यांसह रोहितदादा आर. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत सूचना करून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तर रोहितदादांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबत योग्य त्या सूचना देऊन तसा पाठपुरावा ही केला. सततच्या पाठपुराव्यामुळे शुक्रवारी तब्बल 150 वर्षांनी या ब्रिटिशकालिन तलावात पावसाळ्या व्यतिरिक्त पाणी तलावात पाणी आले. पाणी आल्यामुळे कवठेएकंद, नागाव कवठे, कुमठे येथील हजारो हेक्टर जा†मनीला या पाण्याचा लाभ होणार आहे. ग्रामस्थांनी रोहितदादांचे आभार मानून कौतुक केले.