For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीओकेतील 150 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत

06:32 AM Dec 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीओकेतील 150 दहशतवादी  भारतात घुसखोरीच्या तयारीत
Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवून आणण्याचा कट 

Advertisement

वृत्तसंस्था/ पुंछ

पीर पंजालच्या पर्वतरांगांमध्ये पुन्हा हिमवृष्टी होण्यासोबत घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये वाढ होण्याची शक्यता पाहता पुंछमध्ये नियंत्रण रेषेला लागून असलेल्या क्षेत्रांमध्ये सैन्याने गस्त वाढविली आहे. सद्यकाळात पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे 18 लाँचिंग पॅड असून तेथे 150 हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. याचमुळे रक्त गोठविणाऱ्या थंडीदरम्यान सीमांच्या सुरक्षेकरता तैनात सैनिक चार ते पाच फूटांपर्यंत जमा झालेल्या बर्फातही गस्त घालत शत्रूचे कट उधळून लावण्यासाठी झटत आहेत.

Advertisement

धुके आणि रात्रीच्या काळोखातही शत्रूवर नजर ठेवण्यासाठी थर्मल इमेजिंग डिव्हाइस, नाइट व्हिजन कॅमेरे आणि युएव्ही ड्रोन समवेत अत्याधुनिक देखरेख प्रणालीचा वापर जवान घुसखोरी रोखण्यासाठी करत आहेत. घुसखोरीविरोधी कारवाईत अत्याधुनिक  तंत्रज्ञान आणि अभिनव रणनीतिंचा वापर केला जात आहे.

पाकिस्तानातील अंतर्गत स्थिती बिघडल्यावर आयएसआय आणि अन्य दहशतवादी संघटनांदरम्यान बैठक झाली असून यात भारतीय क्षेत्रात घुसखोरी वाढविण्यावर विशेष चर्चा झाली असल्याचे समजते. याच इनपूटच्या आधारावर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या जवानांनी दक्षता वाढविली आहे.

अनेक दहशतवादी सक्रीय

2024 मध्ये सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनेच्या  सुमारे 60 सदस्यांना यमसदनी पाठविले आहे. यातील सुमारे 48 दहशतवादी पाकिस्तानचे नागरिक होते.  जम्मू-काश्मीरमध्ये सद्यकाळात अनेक दहशतवादी सक्रीय आहेत. या दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी सुरक्षा दलांकडून मोठ्या स्तरावर मोहीम हाती घेण्यात आली आहे.  दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांची हानी होऊ नये याकरता सैन्य अत्याधुनिक देखरेख प्रणाली आणि ड्रोनद्वारे नियंत्रण रेषेवर नजर ठेवून आहे. याचबरोबर सीमावर्ती भागात सैनिक मोहिमेसाठी रवाना झाल्यावर अत्याधुनिक ड्रोन त्यांचा साथीदार म्हणून झेप घेत आहे. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडत आहेत का हे ड्रोनद्वारे पाहिले जातेय. ड्रोनमुळे परिसर सुरक्षित असल्याचे संकेत मिळाल्यावर सैन्याचे पथक मोहिमेसाठी पुढे सरकत आहे.

Advertisement
Tags :

.