महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिलांना दरवर्षी 15 हजार रुपये देणार

05:58 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची घोषणा : कर्नाटकच्या धर्तीवर गृहलक्ष्मी योजना राबविणार

Advertisement

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील 20 मतदारसंघांसाठी मतदान पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्यातील 70 जागांसाठी लवकरच मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीदरम्यान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास महिलांसाठी ‘गृहलक्ष्मी योजना’ सुरू करणार असल्याचे बघेल यांनी सांगितले आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना दरवर्षी 15 हजार रुपये दिले जातील अशी माहिती बघेल यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

Advertisement

छत्तीसगडमध्ये भाजपने देखील महिलांना दरवर्षी 12 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या या घोषणेला भाजपच्या महतारी वंदन योजनेचे प्रत्युत्तर मानले जात आहे. दिवाळीच्या शुभक्षणी छत्तीसगडमध्ये माता लक्ष्मीची सर्वांवर असीम कृपा राहू दे, माता लक्ष्मीने पाच वर्षांपर्यंत छत्तीसगडच्या प्रत्येकाला स्वत:ला आशीर्वाद दिला आणि आम्ही ‘गढबो नवा छत्तीसगड’च्या नव्या मिशनवर वाटचाल करू शकलो आहोत. माझा छत्तीसगड विकसित होऊ दे, आम्हाला गरीबीचा अभिशाप मिटविण्याचे बळ मिळावे या संकल्पासोबत आमच्या सरकारने पाच वर्षे काम केले आहे. दिवाळीच्या शुभदिनी आम्ही आमच्या माता आणि भगींना आणखी समृद्ध तसेच सक्षम पाहू इच्छितो असे उद्गार बघेल यांनी सोशल मीडियावर गृहलक्ष्मी योजनेची घोषणा करताना काढले आहेत.

जनतेने काँग्रेसला मतदान करावे. सत्तेवर आल्यावर आम्ही ‘छत्तीसगड गृहलक्ष्मी योजना’ सुरू करू. याच्या अंतर्गत आम्ही प्रत्येक महिलेला 15 हजार रुपये दरवर्षी देणार आहोत. याकरता माताभगिनींना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तसेच कुठलाही अर्ज देखील भरावा लागणार नाही. काँग्रेसचे सरकार आणा, सरकार स्वत:हून सर्वेक्षण करविणार आहे. सर्वकाही ऑनलाइन असेल आणि पैसे थेट खात्यात जमा केले जातील असा दावा बघेल यांनी केला आहे.

रमण सिंहांकडून अर्ज जारी

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी महतारी वंदन योजनेसाठी अर्ज जारी केला आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर महतारी वंदन योजना लागू होणार आहे. याचा अर्ज भरून महिलांनी भाजपच्या कार्यालयात जमा करावा असे आवाहन रमण सिंह यांनी केले आहे. भाजपच्या घोषणेनुसार या योजनेचा लाभ केवळ विवाहित महिलांनाच मिळणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article