महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वागातोर येथे 15 लाखाचा ड्रग जप्त

12:04 PM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ब्रिटिश पर्यटकाला अटक, सीआयडीची कारवाई : संशयितास सहा दिवसांची पोलीस कोठडी

Advertisement

पणजी : गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ओझरान, वागातोर येथे केलेल्या कारवाईत 15 लाख ऊपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणी एका ब्रिटिश नागरिकाला अटक केली असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव जॉन पार्किन्सन (वय 52, लंडन) असे आहे. तो पर्यटक म्हणून यावर्षी जानेवारीत गोव्यात आला होता. यापूर्वी अनेकवेळा तो गोव्यात येऊन जाऊन होता. सध्या तो हणजूणा येथे राहत होता. संशयित ड्रग्ज प्रकरणात असल्याचा पोलिसांना सुगावा लागला होता. त्यानुसार पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. मंगळवारी मध्यरात्री तो ओझरान वागातोर येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 15 लाख ऊपये किमतीचा एलएसडी जप्त केला आहे. सीआयडी निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या नेतृत्वाखाली सीआयडी पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article