For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमरनाथ यात्रेकरूंची 14 वी तुकडी रवाना

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमरनाथ यात्रेकरूंची 14 वी तुकडी रवाना
Advertisement

 4,885 भाविकांचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था /जम्मू

बालटाल आणि पहलगाम मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याने वार्षिक अमरनाथ यात्रा शांततेत सुरू आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कडेकोट बंदोबस्तात 4,885 यात्रेकरूंची 14 वी तुकडी गुऊवारी पहाटे जम्मू शहरातील बेस पॅम्प बालटाल आणि पहलगाम येथून काश्मीरला रवाना झाली. 28 जूनपासून भाविक अमरनाथ गुहेच्या दिशेने मार्गस्थ झाले असून आतापर्यंत हजारो जणांनी दर्शन घेतले आहे. मध्यंतरी मुसळधार पावसामुळे काही काळासाठी भाविकांना रोखण्यात आले असले तरी आता पुन्हा मार्गक्रमण सुरू झाले आहे.

Advertisement

दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या कारवाईनंतर भगवतीनगर बेस पॅम्प आणि यात्रामार्गाच्या आसपास सुरक्षा कडक करण्यात आली आहे. सर्व यात्रेकरू भगवतीनगर बेस पॅम्प येथून बस आणि हलक्मया वाहनांच्या ताफ्यातून निघाले.  2,991 यात्रेकरूंनी यात्रेसाठी 48 किमी लांबीचा पारंपरिक पहलगाम मार्ग निवडला असून 1,894 यात्रेकरूंनी गुहेच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुलनेने लहान (14 किमी) परंतु कठीण असा बालटाल मार्ग निवडला आहे.

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी 28 जून रोजी अमरनाथ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हापासून जम्मू बेस पॅम्पवरून एकूण 77,210 यात्रेकरू घाटीकडे रवाना झाले आहेत. 52 दिवसांच्या यात्रेची 19 ऑगस्टला सांगता होणार आहे. यात्रेदरम्यान गेल्यावषी साडेचार लाखांहून अधिक भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले होते. यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.