For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसटीचे 14 हजार 662 अपघात

05:53 PM Dec 20, 2024 IST | Radhika Patil
एसटीचे 14 हजार 662 अपघात
14 thousand 662 accidents in ST
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

एसटीचे गेल्या सहा वर्षात एकूण 14 हजार 662 अपघात झाल्याची नोंद आहे. यामध्ये यंदाची वर्षी 2 हजार 286 अपघातांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण काही अंशी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ना नफा ना तोटा तत्वावर राज्यात सार्वजाणिक वाहतूक सेवा देत आहे. वाड्या वस्त्या, दुर्गभ भागात प्रवासी संख्या कमी असतानही तेथे बस सेवा दिली जाते. राज्यभरात रोज सरासरी 60 लाख प्रवाशी एसटीतून प्रवास करतात. खासगी ट्रव्हलर्स कंपनीच्या स्पर्धेत टिकण्यासाठीही एसटीने आता कात टाकणे सुरू केले आहे. 100 टक्के आरामबस सुरू केल्या आहेत. ई बससह एसी बसही एसटीत दाखल झाल्या आहेत. महायुती सरकारने महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरू केल्यानंतर एसटीच्या प्रवासी संख्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्या तुलनेत बसची संख्या अपुरी आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 2018-19 मध्ये 16 हजार 424 बस होत्या. ही बसची संख्या कमी होत 2023-24 मध्ये (नोव्हेंबरपर्यंत) 14 हजार 61 वर त्यामुळे सर्वच एसटी बस फुल्ल असतात. एसटीसाठी ही जमेची बाजू असली तरी एसटीचे अपघात आता डोकेदुखीचा विषय बनला आहे. अपुरे कर्मचाऱ्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना डब्बल ड्यूटी करावी लागत आहे. काही चालु बसमध्ये तांत्रिक बिघाड होत आहे. यामुळेही अपघात होत असल्याचे समोर येत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर अखेर राज्यात एसटीचे 2 हजार 286 अपघात झाले आहेत. यामध्ये 1755 अपघातामध्ये मृत्यूची घटना घडली आहे. तर 8 हजार 27 अपघात गंभिर स्वरूपाचे तर 6 हजार 782 अपघात किरकोळ स्वरूपाचे असल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे 2019, 2020 आणि 2023 मध्ये 3 हजारांवर अपघात झाले आहेत. त्या तुलनेत या वर्षी कमी अपघात झाले आहेत. अपघाताचे प्रमाण शुन्य आणणे एसटी महामंडळासमोर आव्हान आहे. तरीही एसटी प्रशासनाकडून यावर युद्धपातळीवर उपाय योजना केल्या जात आहेत. चालकांना प्रशिक्षण, आरोग्य शिबिर, कार्याशाळ घेतल्या जात आहेत. बसचा वेळच्या वेळी मेंटनन्स करण्यासही प्राधान्य दिल्याचे समजते.

Advertisement

किलोमीटर मागे अपघाताची स्थिती

2019 मध्ये 6 लाख 25 हजार किलोमीटरमागे 1, 2019-20 मध्ये 5 लाख 88 हजार 235 किलोमीटरमागे 1 अपघात झाला होता. 2020- 21 मध्ये 5 लाख 88 हजार 235 किलोमीटरमागे 1 अपघात, 2021-22 मध्ये 5 लाख 55 हजार 555 किलोमीटरमागे 1 अपघात, 2022- 23 मध्ये 5 लाख 55 हजार 555 किलोमीटरमागे 1 अपघात झाला होता. 2023- 24 मध्ये नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार 5 लाख 26 हजार 315 किलोमीटरमागे 1 अपघात नोंदवला गेला आहे.

वर्ष                    अपघातांची संख्या

2019                       3310

2020                      3337

2021                     1444

2022                    1281

2023                    3014

2024                   2286

Advertisement
Tags :

.