For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नायब सैनी यांच्यासह 14 जण शपथबद्ध

07:15 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
नायब सैनी यांच्यासह 14 जण शपथबद्ध
Advertisement

हरियाणा मंत्रिमंडळात 5 ओबीसी चेहरे : दोन महिलांचाही समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/पंचकुला

हरियाणात भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले असून नायबसिंग सैनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. पंचकुला येथील दसरा मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल बंगारू दत्तात्रेय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सैनी यांच्याव्यतिरिक्त अन्य 13 मंत्र्यांनीही शपथ घेतली. याद्वारे वेगवेगळ्या समुदायांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मानले जात आहे. नायबसिंग सैनी यांच्या नेतृत्त्वाखालीला नव्या मंत्रिमंडळात 35 टक्के बिगर जाट ओबीसी मंत्री आहेत. तर 50 टक्के म्हणजेच 7 मंत्री ओबीसी प्रवर्गातील आहेत. मंत्रिमंडळात दोन महिला पॅबिनेट मंत्रीही समाविष्ट आहेत.

Advertisement

हरियाणात गुरुवारी झालेल्या शाही शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याशिवाय चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे, योगी आदित्यनाथ, भूपेंद्र पटेल, लालन सिंह, चिराग पासवान यांच्यासह एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य नेतेही सोहळ्यात सहभागी झाले होते.

सैनी मंत्रिमंडळात भाजपने जातीय समतोल राखला असताना बड्या नेत्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंत्रिमंडळात दोन जाट, दोन ब्राह्मण, एक राजपूत, एक गुर्जर, दोन वैश्य, दोन दलित आणि दोन यादव यांचा समावेश आहे. सीएम नायबसिंग सैनी आणि राजेश नागर हे स्वत: ओबीसी समाजातील आहेत. 14 सदस्यांच्या मंत्रिमंडळात बिगर जाट ओबीसींचा एकूण सहभाग 5 म्हणजे 35 टक्के आहे.

सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनंतर अंबाला कँटचे आमदार अनिल विज यांनी शपथ घेतली. त्यांनी 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. मात्र, अमित शाह यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेत आपण पक्ष देत असलेली कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले. राव इंद्रजित सिंग यांच्या कन्या आणि अटेलीच्या आमदार आरती राव यांना मंत्री करून अहिरवालमध्ये भाजपच्या विजयाची भेट दिली. अहिरवाल भागातील ज्येष्ठ नेते राव नरबीर सिंग यांनाही मंत्री करण्यात आले. चौथ्या क्रमांकावर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अरविंद शर्मा आणि गौरव गौतम यांना ब्राह्मण कोट्यातून मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. हरियाणाच्या बरवाला मतदारसंघातून विजयी झालेले रणवीर सिंग गंगवा हे देखील ओबीसी आहेत. जाट कोट्यातील श्रुती चौधरी आणि पानिपत ग्रामीणचे आमदार महिपाल धांडा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. दलित चेहरा कृष्णलाल पनवार यांनी तिसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली. पलवलमधून विजयी झालेले गौरव गौतम हे सर्वात तऊण मंत्री आहेत. काँग्रेस नेते करणसिंग दलाल यांना पराभूत करण्याचे बक्षीस त्यांना मिळाले आहे.

शपथबद्ध झालेले मंत्री

  • नायबसिंग सैनी - मुख्यमंत्री-ओबीसी
  • अनिल विज - पंजाबी वैश्य
  • विपुल गोयल- वैश्य
  • महिपाल धांडा -जट
  • श्रुती चौधरी ा जाट
  • राव नरबीर - यादव (ओबीसी)
  • आरती राव - यादव (ओबीसी)
  • गौरव गौतम ा ब्राह्मण
  • अरविंद शर्मा - ब्राह्मण
  • श्यामसिंह राणा - राजपूत
  • कृष्णकुमार बेदी - दलित
  • कृष्णलाल पनवार- दलित
  • रणवीर गंगवा - ओबीसी
  • राजेश नगर - गुर्जर (ओबीसी)
Advertisement
Tags :

.