महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

14 पाकिस्तानी नागरिकांना अटक

06:06 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर पोलिसांची दिल्ली, हैदराबाद, चेन्नई येथे कारवाई : गैरकृत्यात सहभागी असल्याचा संशय

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

काही दिवसांपूर्वी बेंगळूरच्या आनेकल परिसरातील जिगणी येथे बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली होती. त्यांची कसून चौकशी केली जात असून धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. दरम्यान, बुधवारी बेंगळूर पोलिसांनी देशभरात लपून बसलेल्या आणखी 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. त्यामुळे बेकायदा वास्तव्य प्रकरणी अटक झालेल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या 22 वर पोहोचली आहे. बेंगळूरच्या जिगणी येथील पाकिस्तानी नागरिकाला अटक झाल्याच्या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळत आहे. जिगणी पोलिसांनी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद व इतर प्रमुख शहरांमधून 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. यावरून पाकिस्तानी नागरिकांचे भारतात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वास्तव्य असून विविध गैरकृत्यात सामील असल्याचे उजेडात आले आहे. अटकेतील आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.

जिगणी येथून परवेझ याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या संपर्कात असणाऱ्या इतरांची नावेही समोर आली आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके नेमण्यात आली होती. मेहदी फाऊंडेशनच्या संपर्कात असणाऱ्या अन्य 14 जणांना दिल्ली, चेन्नई, हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. धर्मप्रचारासाठी त्यांनी भारतात घुसखोरी केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. मुळच्या पाक येथील सय्यद, त्याची पत्नी आणि मुलीने नाव बदलून बेंगळुरात वास्तव्य केले होते. बाहेरच्या जगाशी अधिक संपर्क न राहता कमालीची गुप्तता बाळगून ते येथे पिन्य परिसरात वास्तव्यास होते. 2019 मध्ये सय्यद आणि त्याचे कुटुंब युट्यूबवर धर्मप्रचाराच्या कामात गुंतले होते. ते 2014 मध्ये भारतात आले होते. बोगस आधारकार्ड व अन्य ओळखपत्रे बनवून घेतल्याची बाबही त्यांच्या अटकेनंततर समोर आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article