महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पिकअप उलटून राजस्थानात 14 ठार

01:00 PM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

21 जखमींवर विविध इस्पितळात उपचार

Advertisement

वृत्तसंस्था /दिंडोरी

Advertisement

राजस्थानातील दिंडोरी येथे भीषण रस्ता अपघात झाला असून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शाहपुरा पोलीसस्थानक आणि बिछिया पोलीस चौकी हद्दीतील बडझरच्या घाटात पिकअप वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाल्याने हा अपघात झाला. 14 मृतांमध्ये नऊ पुऊष आणि पाच महिलांचा समावेश आहे. 21 जखमींमध्ये नऊ पुऊष आणि 12 महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमींपैकी दोघांना अधिक उपचारार्थ जबलपूरला पाठविण्यात आले आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातग्रस्त वाहनातील लोक एका बेबी शॉवर समारंभाला उपस्थित राहून परतत होते. अपघातातील जखमींवर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदत व बचावकार्य राबवले. जखमींना ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वजण देवरी गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मसूर घुगरी येथून परतत असताना अचानक पिकअप वाहनावरील नियंत्रण सुटून 20 फूट शेतात पडले.  घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विकास मिश्रा आणि पोलीस प्रमुख अखिल पटेल यांनी इस्पितळात पोहोचून जखमींची विचारपूस केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article