For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यातून 1337 श्रीरामभक्तांचे अयोध्येला प्रयाण

11:52 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यातून 1337 श्रीरामभक्तांचे अयोध्येला प्रयाण
Advertisement

खासदार सदानंद तानावडेंनी दाखविला हिरवा झेंडा

Advertisement

वास्को : गोव्यातून अयोध्या धाम यात्रेसाठी काल सोमवारी रात्री वास्को रेल्वे स्थानकावरून पहिली आस्था विशेष ट्रेन रवाना झाली. मडगावहून मुंबईमार्गे ही ट्रेन अयोध्येला जाणार आहे. या पहिल्या फेरीत 1337 श्रीरामभक्तांनी अयोध्येकडे प्रयाण केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी रात्री सव्वा दहाच्या सुमारास या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी ही खास सेवा उपलब्ध केलेली असून शेकडो कार्यकर्त्यांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे. वास्को रेल्वे स्थानकावर छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार तानावडे यांच्यासह यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर तसेच मुरगावचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर, रेल्वेचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 गुरुवारी सकाळी 11 वा. श्रीरामललाचे दर्शन

Advertisement

सदानंद तानावडे यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारने देशात केलेल्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. देशाला नरेंद मोदींसारखे महान नेते लाभल्यानेच हे कार्य शक्य झाल्याचे ते म्हणाले. ही ट्रेन गुरूवारी सकाळी अयोध्येला दाखल होणार असून सकाळी 11 वाजता या रामभक्तांना श्रीरामललाचे दर्शन होणार आहे, असे तानावडे म्हणाले. मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही सरकारचा गौरव केला. तसेच अयोध्या तीर्थयात्रेचा सर्वच भाविकांना लाभ घेता यावा यासाठी या तीर्थयात्रेचाही शासकीय योजनेत समावेश करण्यात येईल, अशी माहिती दिली. वास्कोतून निघालेली आस्था ट्रेन मडगाव व थिवी येथे कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येकडे रवाना झाली.. या रामभक्तांसह गोव्याचे मंत्रीमंडळही गुरूवारी सकाळी अयोध्येतील मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.

Advertisement
Tags :

.