130 वर्षे जुने अद्भूत यंत्र
पक्ष्यांसारखा काढते आवाज
सोशल मीडियावर 134 वर्षे जुन्या एका यंत्राचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे यंत्र हुबेहुब पक्ष्यांसारखे आवाज काढू शकते. यंत्राचा आवाज ऐकून तुम्हाला प्रथमदर्शनी विश्वासच बसणार नाही. हे यंत्र आकारात छोटे असले तरीही त्याचे डिझाइन अचंबित करणारे आहे. ‘द हाउस ऑफ ऑटोमाटा’नुसार 1890 मध्ये ब्लेज बोटेम्स यांच्याकडून याची निर्मिती करण्यात आली होती. 1890 मध्ये पॅरिस येथे ब्लेज बोटेम्स यांनी या उपकरणाची निर्मिती केली होती. हे उपकरण पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करते. अलिकडेच मायकल स्टार्ट यांच्याकडून या यंत्राला पुन्हा जुने स्वरुप देण्यात आले आहे. हे उपकरण गियर, स्प्रिंग्स आणि धौंकनीने संचालित एक जटिल प्रणाली असून यात पक्ष्यांचा आवाज काढण्याची क्षमता आहे. या यंत्रातून निघणारा पक्ष्यांचा आवाज अत्यंत मधूर असून तो किंचितही कर्कश वाटत नाही.
1890 मध्ये पॅरिस येथे निर्माण करण्यात आलेले हे उपकरण आश्चर्यकारकरित्या अचूकतेसह पक्ष्यांचा आवाज काढू शकते. हे एक आकर्षक उपकरण असून ते कुठल्या प्रजातीच्या पक्ष्यांचा आवाज काढू शकते हे अद्याप स्पष्ट नाही. ब्लेज बोंटेम्स हे स्वत:च्या कारकीर्दीच्या प्रारंभी घड्याळ दुरुस्तीचे काम करायचे. एकेदिवशी एका ग्राहकाने म्युझिकल स्नफबॉक्स दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे आणला होता. हा बॉक्स दुरुस्त करत असताना त्यातून निघणारा आवाज आणखी चांगला करण्यासाठी त्यांनी त्यात सुधारणा केली होती. यानंतरच ब्लेज यांच्यात अशाप्रकारचे म्युझिकल बॉक्स निर्माण करण्याची रुची निर्माण झाली. त्यांनी स्वयंचलित पक्षी आणि प्राण्यांसारखे दिसणारी अनेक उपकरणे तयार केली, ज्यांना ऑटोमेटन म्हटले जात होते. पुढील काळात ब्लेझ बोंटेम्स हे ऑटोमेटन सिंगिंग बर्ड्स यासारखी अनेक ऑटोमेटन उपकरणे निर्माण करणारे तज्ञ म्हणून लोकप्रिय झाले होते. अलिकडेच त्यांच्या एका बर्ड सिंगिंग उपकरणाला द हाउस ऑफ ऑटोमोटाच्या मायकल स्टार्ट यांनी पुन्हा दुरुस्त केली आहे. हाउस ऑफ ऑटोमोटा यंत्रांचे एक संग्रहालय आहे.