‘सीपीआर’मध्ये गालफुंगीग्रस्त 13 वर्षीय मुलावर यशस्वी उपचार
कोल्हापूर
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालमध्ये (सीपीआर) गालफुंगी (श्ळश्झ्ए) आजाराने ग्रस्त एका 13 वर्षीय मुलावर यशस्वी उपचार करण्यात आले. त्याला 20 दिवसापूर्वी सीपीआरमधील औषधवैद्यकशास्त्र विभागात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता आठ दिवसापूर्वी त्याला गालफुंगी आजार झाल्याचे निदान झाले.
दररोज 300 मिटर धावणारा 13 वर्षाच्या मुलगा अचानक पाय जड झाल्याने चालता येईना. सकाळी अंथरूणातून उठताना पायाला ताकत लागत नसल्याचे पालकांच्या लक्षात आले. घबरलेल्या पालकांनी त्याला तत्काळ सीपीआरमधील औषधवैद्यकशास्त्र विभागात दाखल केले. डॉक्टरांनी सर्व माहीती घेवून हा दुर्मिळा आजार झाल्याचे सांगितले.
सात दिवसात त्याचा पाय आणखी जड होत चालल्याने पोस्ट व्हायरल मायलीटीज हा आजार झाला असल्याचे लक्षात आले. त्यासाठी रक्ताच्या विविध चाचण्या केल्या. त्याच्या रक्तात एमओजी अँटीबॉडी पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला. यानंतर लगेचच औषधवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टरांनी उपचाराला सुरूवात केली. त्याला सात प्लाझ्मा देण्यात आले. यानंतर हळुहळु त्याच्या पायाची ताकद वाढली. गुरूवारी तो स्वत:च्या पायावर उभा राहीला असुन त्याला डॉक्टरांनी डिस्चार्जही दिला आहे.
औषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख अनिता परितेकर, डॉ. विद्या पाटील, डॉ. वरून बाफना, डॉ. शैलेंद्र कुंभार, डॉ. प्रतिक नेरलेकर, डॉ. कृष्णा टपारीया, डॉ. प्रणव गुल्हाने, डॉ. अमृत जाधव, डॉ. कृष्णा डिंगरे, डॉ. रोहन, डॉ. श्रीकृष्ण यांनी उपचार केले. सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी मार्गदर्शन केले.