महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरातमध्ये बोट उलटून 13 विद्यार्थी, 2 शिक्षकांचा मृत्यू

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वडोदरातील हृदयद्रावक दुर्घटना : सहलीला गेलेल्या विद्यार्थी-शिक्षकांवर काळाचा घाला

Advertisement

वृत्तसंस्था /वडोदरा
Advertisement

गुजरातमधील वडोदरा येथील हर्णी तलावात गुऊवारी सायंकाळी पिकनिकला गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांची एक बोट उलटून हृदयद्रावक दुर्घटना घडली. या अपघातात 13 मुले आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाला. बोटीतील उर्वरित 10 मुले आणि 2 शिक्षकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोटीतून प्रवास करत असताना कोणीही लाईफ जॅकेट घातले नसल्याने जीवितहानीचा आकडा वाढल्याचे सांगण्यात आले. वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटल्याची दुर्घटना घडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. बोटीत 4 शिक्षकांसह 23 मुले जलविहार करण्यासाठी गेली असताना अतिरिक्त वजनामुळे बोट उलटली. प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थी शाळेच्या सहलीसाठी हर्णी तलावावर आले असता हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले होते. तलावातून काही विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आल्याचे वडोदराच्या महापौर पिंकी सोनी यांनी सांगितले. घटनेच्या वेळी बोटीमध्ये एकूण 23 मुले आणि 4 शिक्षक होते. व्हीएमसी अग्निशमन विभागाने तलावात बचावकार्य केले. ही मुले शहरातील वाघोडिया परिसरातील न्यू सनराईज स्कूलमधील होती, अशी माहितीही त्यांनी दिली. वडोदरा शहरातील हर्णी तलावाचे व्यवस्थापन वडोदरा महानगरपालिकेअंतर्गत कोटिया फर्मद्वारे केले जाते.

10 ते 11 जणांना वाचवले : अग्निशमन अधिकारी

बोट उलटल्याची माहिती मिळाल्यानंतर वडोदरा अग्निशमन विभागाच्या सर्व 6 टीम तलावावर पोहोचल्या होत्या. बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना जान्हवी ऊग्णालयात पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत 10 ते 11 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अग्निशमन विभागाने त्यांना घटनास्थळी सीपीआरही दिला असून विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या ऊग्णालयात पाठवण्यात आल्याचे वडोदराचे मुख्य अग्निशमन अधिकारी पार्थ ब्रह्मभट्ट यांनी सांगितले. छाया पटेल आणि फाल्गुनी सुर्ती अशी मृत शिक्षकांची नावे आहेत.

निष्काळजीपणाचा आरोप

बचाव करण्यात आलेल्या सात विद्यार्थ्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुले बोटीत चढल्यानंतर त्यांना घालण्यासाठी लाईफ जॅकेट देण्यात आले नव्हते, ही मोठी चूक असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. तसेच या बोटीची क्षमता केवळ 15 लोकांची असताना त्यात 27 जण होते, असा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article