दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉनमध्ये धावणार 13 कोल्हापुरी धावपटू
कोल्हापूर :
धावपटूने केलेल्या सरावाची जणू परीक्षाच घेणारी स्पर्धा म्हणून जागतिक स्तरावर ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन‘अंतर्गत होणाऱ्या अल्ट्रा मॅरेथॉनकडे पाहिले जाते. दक्षिण आफ्रिकेत येत्या रविववार 8 रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी 21, 50 किलो मीटर नव्हे तर तब्बल 90 किलो मीटर असे आव्हानात्मक स्वऊपाचे आंतर धावावे लागणार आहे. शिवाय धावण्याचा मार्गही चढ उताराबरोबर घाटमाथा अशा आव्हानात्मक स्वऊपाचा आहे. हे भले मोठ आंतर धावत कापण्यासाठी सरावच करावा लागतो. कोल्हापुरातील जाबाज 2 तऊणींसह 13 धावपटू नित्य सरावाच्या जोरावर 90 किलो मीटरचे आंतर गाठण्याचे आव्हान स्वीकारले. हे आव्हान गाठण्यासाठी मंगळवार 3 रोजी सर्व धावपटू दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत.
कॉम्रेडस् मॅरेथॉन ही 1921 पासून सुरु करण्यात आली आहे. जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित मॅरेथॉन म्हणून कॉम्रेड्स मॅरेथॉनकडे पाहिले जाते. यंदा मॅरेथॉनचे 98 वे वर्ष आहे. दक्षिण आफ्रिकेतील पीटर्समारीजबर्ग येथून कॉम्रेड्स मॅरेथॉनअंतर्गत होणाऱ्या अल्ट्रा मॅरेथॉनला सुऊवात होत आहे. पुढे 90 किलो मीटर ंआंतरावर असलेल्या डरबनमध्ये या मॅरेथॉनची समाप्ती होईल. मार्गातील तब्बल 1250 मीटरचे आंतर हे अडथळे आणि चढाईचे असणार आहे. हे अडथळे पार करताना मार्गात येणाऱ्या 7 मोठ्या डोंगरावऊन धावताना सर्वच धावपटूंना खडतर अशा चढ-उतारांशी सामना करावा लागणार आहे. शिवाय डोंगराळ भागातील गारठून सोडणाऱ्या 2 ते 14 अंश तापमानाशी अतिशय संयमाने धावपटूंना धावा करण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. अशा या स्पर्धेत जगभरातून 35 हजार पुरुष व महिला स्पर्धक प्रतिनिधीत्व करत आहेत. कोल्हापुरातील 13जणांसह संपूर्ण भारतातून 350 पुऊष व 50 महिला प्रतिनिधीत्व करणार आहेत.
कोल्हापुरातील धावपटूंनी सहा महिन्यांपूर्वीच आव्हानात्मक आंतर गाठण्यासाठी मानसिक तयारी कऊन ठेवली होती. कोल्हापूरसह इचलकरंजीतील दोघा धावपटूंनी जोतिबा-केर्ली असे तीन वेळा आणि पन्हाळगड ते वाघबीळ असे आंतर ठराविक दिवसांमध्ये प्रत्येकी तीन वेळा धावण्याचा सराव कऊन अल्ट्रा मॅरेथॉनचे नियोजित 90 किलो मीटरचे आंतर गाठण्यासाठी स्वत:ला फिट केले आहे. इचलकरंजीतील धावपटू अमरपालसिंग कोहली हा मिरजपासून 20 किलो लांब असलेल्या दंडोबा देवस्थानच्या डोंगरावर आठवड्यातील ठराविक दिवस सराव करत आहेत. तसेच इचलकरंजीतील विविध रस्त्यांवरही कित्येक किलो मीटर धावून 90 किलो मीटरचे आंतर गाठण्यासाठी परीश्रम घेत आहेत.
- चिअर अपसाठी 5 किलो मीटराच्या मॅरेथॉनचे आयोजन :
दक्षिण आफ्रिकेतील अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या कोल्हापूर व इचलकरंजीतील धावपटूंना चिअर-अप करण्यासाठी 5 किलो मीटर आंतराची मॅरेथॉन आयोजित केली होती. यात जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता, अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्या धावपटूंसह विविध वयोगटातील 40 धावपटूंनी सहभाग घेतला. पोलीस कयावत मैदान ते डीवायपी मॉल असा मॅरेथॉनसाठी मार्ग नियोजित केला होता. मॅरेथॉनच्या सांगतेनंतर अल्ट्रा मॅरेथॉनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी धावपटूंना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना धावपटू चेतन चव्हाण म्हणाले की, अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये यश मिळविण्यासाठी तेराही धावपटूंनी अगदी कसून सराव केला आहेत. पूर्वी झालेल्या 8 ते 10 अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये प्रतिनिधीत्व कऊन यश तर मिळवले आहेच, शिवाय मोठा अनूभवही आमच्या उदरात साठवला आहे. या अनुभवाच्या जोरावर आम्ही 13 जण अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये यश संपादन कऊन देशाचा तिरंगा लहरण्यासाठी कमालीचे उत्सुक आहोत, असेही चव्हाण यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेतील अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये प्रतिनिधीत्व करणारे धावपटू :
चेतन चव्हाण, डॉ. विजय कुलकर्णी, गोरख माळी, अमोल यादव, दिलीप जाधव, डॉ. पराग वाटवे, सुषमा रेपे (सर्व रा. कोल्हापूर), विजय पाटील (रा. वळीवडे), पंकज रावळू (उचगाव), स्वरुप पुजारी (रा. नृसिंहवाडी), सचिन भुरसे, अम्रपालसिंग कोहली, केतकी साखरपे (तिघे रा. इचलकरंजी).