महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

13 कोटी प्रवाशांनी केला विमान प्रवास

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : मेमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येत 5 टक्के इतकी वाढ झाली आहे. मे मध्ये जवळपास 13.89 कोटी प्रवाशांनी देशांतर्गत शहरांमध्ये विमान प्रवास केला असल्याचे दिसून आले आहे. कोविड महामारीच्या आधीच्या तुलनेमध्ये विमान प्रवाशांची संख्या मे मध्ये 14 टक्के अधिक वाढलेली आहे. रेटींग एजन्सी इक्रा या संस्थेच्या अहवालामध्ये सदरची माहिती देण्यात आली आहे. देशांतर्गत आणि विदेशांतर्गत विमान फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ मेमध्ये दिसून आली. चालू आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच 2024-25 मध्ये विमान प्रवाशांची संख्या वाढीवच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागच्या महिन्यांमध्ये विमानांच्या संख्येतही वर्षाच्या आधारावर पाहता 6 टक्के वाढ दिसली आहे. याआधीच्या म्हणजे एप्रिल महिन्याच्या तुलनेमध्ये पाहता विमानांची संख्या 2 टक्के अधिक राहिली आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये 13 टक्के वाढीसह 15.4 कोटी लोकांनी देशांतर्गत विमान प्रवास केला होता. 2019-20 या आर्थिक वर्षात ही संख्या (कोरोना आधी) 14.2 कोटी इतकी होती. मागच्या आर्थिक वर्षात आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचा विचार करता 24 टक्के अधिक प्रवाशांनी प्रवास केला होता. 2.96 कोटी प्रवाशांनी विदेशात प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article