कळंगुट येथे 13 दलालांना अटक
तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी
पणजी : समुद्र किनारी आणि इतर पर्यटक स्थळावर पर्यटकाना विविध सुविधांचे आमीष दाखवून लुटणे तसेच पर्यटकांची छळवणूक करणाऱ्या दलालांवर कळंगुट पोलिसांनी कडक कारवाई करणे सुऊ केले आहे. कळंगूट समुद्र किनारी गस्त घालून 13 दलालांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. सर्वंना न्याय दांधिकाऱ्यांसमोर हजर केले असता तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये गणेश लक्ष्मण राठोड (वय 24, बुलेट शोरूम जवळ हडफडे बार्देश), परशुराम अल्लाप्पा खरबरे (27, नाईकवाडा कळंगुट बार्देश), भरीश असमुद्दीन शाहा (वय 18, रा. बागा कलंगुट बर्देश, गोवा मूळ उत्तर प्रदेश) गौरव राकेश शाक्य (वय 23, गौरवाडो कळंगुट बार्देश, मूळ उत्तर प्रदेश) मोहम्मद युनिस खान (18 खोब्रावाडो कळंगुट बार्देश, मूळ उत्तर प्रदेश), अमीर इस्तिगर हुसेन (वय 25, अगरवाडो कळंगुट मूळ उत्तर प्रदेश), अमन नफिश अहमद (वय 19 खोब्रावाडा कलंगुट मूळ उत्तर प्रदेश) सुलतान आलम फिरोज अली (वय 34, कळंगुट, मूळ उत्तर प्रदेश) शादली फद्रुल अली (24, कळंगुट मुळ उत्तर प्रदेश), शान आलम ( वय 32, कळंगुट मूळ उत्तर प्रदेश) तपन कुमार दुर्याधन सामल (वय 32, हणजूण मूळ ओडिशा) आशिष रमेशचंद्र कुमार (वय 27 कळंगुट मूळ उत्तर प्रदेश) रणजीत कुमार (30 बागा सर्कल जवळ मुळ उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.
कळंगूट तसेच इतर समुद्र ठिकाणी दिवसेंदिवस दलालांची संख्या वाढत आहे. पर्यटन हंगाम सुरू झाल्याने राज्यात बेकायदा दलाल वाढले आहेत. हे दलाल पर्यटकांना त्रासदायक ठरतात, बेकायदा दलालांविराधात कडक कारवाई करण्याचे आदेश सरकाराने दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी आता कारवाई करणे सुरू केले आहे, अशी माहिती उत्तर गोवा अधीक्षक राहूल गुप्ता यांनी दिली. राज्यात सर्व समुद्र किनाऱ्यावर तसेच इतर पर्यटक स्थळावर बनावट दलाला विरोधात कारवाई केली जाईल. नववर्ष कार्यक्रमा निमित्ताने राज्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. दलालांचा त्रास होत असल्यास किंवा पर्यटकांना त्रास देताना दिसल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.