बारावीचा निकाल 21ला ! कोल्हापूर विभागांतर्गत 1 लाख 19 हजार 168 विद्यार्थी
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 21 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली. दि. 21 मे रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. कोल्हापूर विभागांतर्गत 1 लाख 19 हजार 168 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. या विद्यार्थ्यांचे पुढचे शैक्षणिक भवितव्य काय आहे ते कळणार असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात धाकधुक वाढली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल पाहावा, असे आवाहन कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष चौगुले यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावीचा आज जाहीर होणार आहे. सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपला निकाल कधी जाहीर होणार याकडे बारावी विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. नुकताच जेईईचाही निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणे सोपे झाले आहे. इंजिनिअरिंग, मेडीकल, कृषी यासह अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बारावीला जिल्हानिहाय बसलेले विद्यार्थी
परीक्षा केंद्र सातारा सांगली कोल्हापूर एकूण
बारावी 35206 32807 51155 119168