For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडक बंदोबस्तात बारावी परीक्षेला सुरुवात

10:29 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडक बंदोबस्तात बारावी परीक्षेला सुरुवात
Advertisement

फ्लाईंग स्क्वॉड, सीसीटीव्हींची परीक्षा केंद्रांवर नजर

Advertisement

बेळगाव : बारावी परीक्षेला शुक्रवारपासून सुरळीत सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कन्नड विषयाचा पेपर घेण्यात आला. यामुळे सकाळपासूनच पालक व विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर गर्दी झाली होती. बेळगाव शहरात 21 परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षेला सुरुवात झाली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 23,565 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 21,289 फ्रेशर्स, 1,304 रिपिटर्स, 972 बहिस्थ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून यामध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यावर्षी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कॉपीला आळा घालण्यासाठी फ्लाईंग स्क्वॉड, तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर निरीक्षकांची नेमणूक केली आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाच्यावतीने आवश्यक सर्व सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात आल्या आहेत.

कन्नड पेपरला 427 जणांची दांडी

Advertisement

पहिल्या दिवशी कन्नड विषयाच्या पेपरला तब्बल 427 विद्याथ्यर्नीं दांडी मारली. कन्नड विषयासाठी एकूण 14,285 विद्यार्थी होते. त्यापैकी 13,858 विद्याथ्यर्नीं शुक्रवारी हजेरी लावली. गैरहजर राहणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने पदवीपूर्व शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

Advertisement
Tags :

.