29 एप्रिलपासून बारावी परीक्षा-2
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने 2024 सालातील बारावी परीक्षा-2 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांवरील दडपण आणि भीती कमी करण्यासाठी शिक्षण खात्याने यंदापासून कर्नाटक बोर्डाची बारावीच्या तीन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत परीक्षा-1 पार पडली. बुधवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लागलीच परीक्षा-2 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 29 एप्रिल ते 16 मे या कालावधीत बारावी परीक्षा-2 होणार आहे.
29 एप्रिल रोजी कन्नड, अरेबिक, 30 एप्रिल रोजी इतिहास, भौतिकशास्त्र, 2 मे रोजी इंग्रजी, 3 मे-राज्यशास्त्र, संख्याशास्त्र, 4 मे-भूगोल, मानसशास्त्र, रसायनशास्त्र, गृहविज्ञान, मूलभूत गणित, 9 मे- तर्कशास्त्र, व्यवहार अध्ययन, गणित, शिक्षणसास्त्र, 11 मे-समाजशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, संगणक विज्ञान, 13 मे-अर्थशास्त्र, 14 मे-ऐच्छिक कन्नड, लेखाशास्त्र, 15 मे-हिंदी, 16 मे-तामिळ, तेलगू, मल्याळ, मराठी, उर्दु, संस्कृत, फ्रेंच या विषयांचे पेपर होतील. सकाळी 10:15 ते दुपारी 1:30 या वेळेत हे पेपर होणार आहेत.