कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

128 वर्षीय ‘पद्मश्री’ शिवानंद बाबांचे निधन

06:35 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन दिवसांपासून बीएचयूमध्ये सुरू होते उपचार

Advertisement

वृत्तसंस्था/ वाराणसी

Advertisement

उत्तर प्रदेशमधील पद्मश्री पुरस्कार विजेते प्रसिद्ध योगगुरू स्वामी शिवानंद बाबा यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. रविवारी वाराणसीतील हरिश्चंद्र घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 128 वर्षीय बाबांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडल्यामुळे त्यांना बीएचयू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2022 मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शिवानंद बाबांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारे देशातील सर्वात वयस्कर व्यक्ती स्वामी शिवानंद बाबा वाराणसीतील दुर्गाकुंड येथील कबीरनगर आश्रमात राहत होते. याप्रसंगी काही शिष्यही त्यांच्यासोबत राहत होते. या वयातही ते नियमितपणे योगाभ्यास करत असत. योगसाधनेमुळे केवळ काशीमध्येच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्वामी शिवानंद यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Advertisement
Next Article