For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावच्या पॅरा जलतरणपटूंना 124 पदके

11:31 AM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगावच्या पॅरा जलतरणपटूंना 124 पदके
Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथे जी स्वीम अकादमी आयोजित कर्नाटक राज्य पॅरा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स क्लबच्या जलतरणपटूंनी 93 सुवर्ण, 23 रौप्य व 8 कांस्यपदकासह घवघवीत यश संपादन केले आहे. बेंगळूर येथे झालेल्या या स्पर्धेत पी.ए.जलतरण फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत स्वीमर्स व एक्वेरेस क्लबच्या जलतरणपटूंनी भाग घेतला होता. यामध्ये दिव्यांग गटात 3 सुवर्ण, सुमीत मुतगेकर, साहिल जाधव, अनिकेत पिळणकर, स्वातिक पाटील, अमोल कांबळे यांनी विविध प्रकारात प्रत्येकी 3 रौप्यपदके, सोनम पाटील, साक्षी पाटील, रम्या लमाणी, अमोघ तंगडी, प्रज्वल हणमशेठ, प्रज्वल नेर्लेकर,

Advertisement

पृथ्वी नेर्लेकर यांनी अंध गटात विविध प्रकारात प्रत्येकी 3 सुवर्णपदक, पार्थ धनाजीने दिव्यांग गटात 3 रौप्य, शरन्या कुंभारने मतिमंद गटात 3 सुवर्ण, मारुती कोप्पदने दिव्यांग गटात 3 सुवर्ण, श्रीकांत देसाईने दिव्यांग गटात 3 रौप्य, बसवराज माळीने अंध गटात 2 रौप्य, समर्थ चंदीगिरीने अंध गटात 2 रौप्य, चिन्मय कामण्णवरने अंध गटात 2 रौप्य, पंकजा रेवणकरने इतर गटात 1 रौप्य, आकाश हंजी, पूर्णिमा चौधी, कविता माडिवालकर यांनी अंध गटात प्रत्येकी 1 सुवर्ण, 1 रौप्य, प्रशांत दडेडवरने दिव्यांग गटात 1 रौप्य, मंदार कट्टीमनी, सौंदर्य दंडीन्नवरने अंध गटात प्रत्येकी 3 सुवर्ण, भूश्रा मुजावरने मतिमंद गटात 3 सुवर्ण, साहील काजूकरने दिव्यांग गटात 3 रौप्य,

लावण्या कोटारन्नवरने अंध गटात 2 रौप्य, अभिनंदन दोरप्पगोळने अंध गटात 1 सुवर्ण, 1 रौप्य, स्वयंम पाटीलने मतिमंद गटात 1 रौप्य 2 कास्य व मारुती किऱ्यावर दिव्यांग गटात 1 कास्य, सई पाटीलने मतिमंद गटात 3 रौप्य पदक पटकाविले. वरील विजेते स्पर्धेक हैदराबाद येथे होणाऱ्या 25 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेसाठी 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान रवाना होणार आहेत. वरील विजेत्या स्पर्धकांना प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर, विनायक आंबेवाडकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.