For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नदीत मिळाले 1200 वर्षे जुने शस्त्र

06:17 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
नदीत मिळाले 1200 वर्षे जुने शस्त्र
Advertisement

सुंदर परंतु धोकादायक वस्तू

Advertisement

अनेकदा लोकांना जुन्या गुहा, पर्वत किंवा पाण्यात असे काहीतरी मिळून जाते, हे पाहिल्यावर सर्वजण चकित होत असतात. अलिकडेच इंग्लंडच्या ऑक्सफोर्डशायरच्या एका इसमासोबत असेच घडले आहे. ट्रेवर पेनी दीर्घकाळापासून येथील एका नदीत खास सामग्रीच्या शोधाकरता मॅग्नेट फिशिंग करत होते.

पेनी हे एन्स्लोनजीक चेरवेल नदीत धातूच्या वस्तूंना शोधण्यासाठी एका स्ट्राँग मॅग्नेटचा वापर करतात. याच फिशिंगदरम्यान पेनी यांना अलिकडेच एक तलवार पाण्यात मिळाली आहे. याची रचना अत्यंत सुंदर होती, परंतु ही तलवार अत्यंत धारदार आहे.

Advertisement

ही तलवार सुमारे 1200 वर्षे जुनी वायकिंग शस्त्र असल्याचे कळल्यावर पेनी चकितच झाले. तलवार मिळाल्यावर उत्सुकतेपोटी त्यांनी स्थानिक संशोधन संपर्क अधिकाऱ्याकडे धाव घेत सत्यापनासाठी तज्ञांना तलवार सोपविली. तज्ञांनी ही तलवार ईसनी सन 850 मधील असल्याचे सांगितले. तसेच ही तलवार एखाद्या वायकिंगची राहिली असावी अशी माहिती दिली. त्या काळात इंग्लंड अँग्लो-सॅक्सन आणि डेनिश वायकिंगदरम्यान वारंवार संघर्ष व्हायचा.

851 मध्ये डेनिश वायकिंग्स प्लायमाउथनजीक उतरले होते, थेम्स नदीतून कँटरबरी आणि लंडन येथे त्यांनी लूट केली होती. परंतु वेसेक्सचे राजे एथेलवुल्फ यांच्या नेतृत्वाखालील अँग्लो-सॅक्सन सैन्याने त्यांना पराभूत केले होते. केंटमधील त्यांचे सर्वात मोठे पुत्र एथेलस्टन यांनी सँडविच किनाऱ्यावर वायकिंगच्या सैन्यावर मोठा हल्ला केला होता आणि शत्रूच्या 9 नौकांवर कब्जा केला होता.

पेनी यांना नोव्हेंबर महिन्यात ही तलवार सापडली होती. याचा शोध आणि सर्टिफिकेशन अत्यंत रोमांचक राहिले आहे. जमिनीचा मालक आणि नद्यांच्या ट्रस्टसोबत माझा वाद होता, त्यांच्याकडून मॅग्नेट फिशिंगला अनुमती दिली जात नव्हती. त्यांनी तलवार एका संग्रहालयाला सोपविण्याची अट घातली होती आणि ती मी पूर्ण केल्याचे पेनी यांनी सांगितले आहे.

मॅग्नेट फिशिंगसाठी अनुमतीची आवश्यकता असते आणि जे काही हस्तगत होत ते जमिनीच्या मालकाचे असते. आता या तलवारीची देखभाल ऑक्सफोर्डशायर संग्रहालयाकडून केली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.