ऑफिससाठी दररोज 1200 मैलाचा प्रवास
इंजिनियरला झाला मोठा त्रास
अमेरिकेच्या एका इंजिनियरची कहाणी व्हायरल होत असून तो ऑफिसला पोहोचण्यासाठी दररोज 1200 मैलाचा दीर्घ प्रवास करत होता. फ्लाइट, ड्राइव्ह आणि ट्रेन तिन्हींच्या मदतीने पूर्ण होणारा हा प्रवास एखाद्या मॅराथॉनपेक्षा कमी नव्हता. अमेरिकेच्या या इंजिनियरची सुपर-कम्युटिंग चर्चेत आहे. तो दररोज ऑफिसला पोहोचण्यासाठी फ्लाइट, ड्राइव्ह आणि ट्रेन तिन्हींचा वापर करायचा. 1200 मैलाचा हा प्रवास त्याच्या खिशाकरता भारी ठरण्यासह आरोग्यासाठीही प्रतिकूल ठरला.
31 वर्षीय एंड्य्रू रेंडर आणि त्याची पत्नी पूर्वी न्यूजर्सी येथे राहायची. परंतु तेथे घर खरेदी करणे त्यांच्या आवाक्यात नव्हते. याचदरम्यान त्याच्या पत्नीला अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये नोकरी मिळाली आणि दोघेही तेथे स्थलांतरित झाले. परंतु रेंडनची नोकरी अद्याप न्यूजर्सीमध्येच होती. जेथे त्याला ऑफिसमधून काम करणे अनिवार्य होते. येथूनच 1200 मैलाच्या प्रवासाची सुरुवात झाली.
दररोज थकविणारा दिनक्रम
रेंडन पहाटे 2 वाजता उठून 3 वाजता कारमधून 2.5 तास ड्राइव्ह करत रॅलेग विमानतळावर पोहोचायचा. येथून तो स्वस्त फ्लाइट पकडून न्यूजर्सीला जायचा, जवळपास 5 तासांच्या उ•ाणानंतर तो ट्रेनने ऑफिसमध्ये पोहोचायचा. दुपार आणि संध्याकाळ ऑफिसमध्ये घालविल्यावर तो हॉटेलमध्ये राहायचा, मग दुसऱ्या दिवसाचे काम संपल्यावर फ्लाइट पकडून नॉर्थ कॅरोलिनात परतत होता. हे सत्र जवळपास 10 महिन्यांपर्यंत चालले.
दर महिन्याला 1.68 लाखापर्यंतचा खर्च
या कम्युटचा खर्च प्रारंभी 1200 डॉलर्स होता (सुमारे 1 लाख रुपये) नंतर जो वाढून 1800-2000 डॉलर्सपर्यंत (सुमारे 1.50-1.68 लाख रुपये) पोहोचला. खर्चात पेट्रोल, फ्लाइट तिकीट आणि हॉटेल वास्तव्याचा खर्च सामील होता. हा प्रवास अत्यंत थकविणारा होता, सातत्याने प्रवास आणि झोपेच्या अभावामुळे मी वारंवार आजारी पडू लागलो. माझ्या प्रकृतीवर प्रतिकूल प्रभाव पडल्याचे रेंडन सांगतो.
पे-कट घेत बदलली नोकरी
सततच्या त्रासानंतर रेंडनने नॉर्थ कॅरोलिनामध्ये नोकरी शोधण्यास सुरुवात केली. परंतु जॉब मार्केटची स्थिती चांगली नसल्याने हे सोपे नव्हते. अखेर त्याला 40 हजार डॉलर्सचा (जवळपास 33 लाख रुपये) वार्षिक पे-कट स्वीकारावा लागला. आता ते स्वत:च्या घरानजीक नोकरी करत असून त्याला दिलासा मिळाला आहे.