महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रामलल्लासाठी 1,200 किलोचा लाडू

06:02 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अयोध्येत साकारत असलेल्या भव्य राममंदिरात 22 जानेवारीला भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या कार्यक्रमासंबंधी देशभरात प्रचंड उत्सुकता आहे. सारा देश राममय झाल्याचे दिसत आहे. अनेक लोक अत्यंत अद्भूत पद्धतीने भगवान रामलल्लांच्या चरणी आपली सेवा लागावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. आपली उत्कट रामभक्ती व्यक्त करण्यासाठी अगदी सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असणारे लोकही कल्पनाशक्तीचा उपयोग करुन भगवान रामलल्लांसाठी अशा वस्तू निर्माण करीत आहेत, की कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. हैद्राबाद येथील नागभूषण रेड्डी हे त्यांच्यापैकीच एक आहेत.

Advertisement

त्यांनी 22 जानेवारीला भगवान रामलल्लांच्या प्रसादासाठी 1,265 किलो वजनाचा प्रचंड ‘लाडू’ बनविला आहे. हा लाडू प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच भगवान रामलल्लांच्या नैवेद्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. बुधवारी हा लाडू एका मोठ्या शीतपेटीतून अयोध्येकडे पाठविण्यात आला आहे. तत्पूर्वी तो पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. नागभूषण रे•ाr हे हैद्राबाद येथे इसवीसन 2000 पासून एक स्वयंपाकगृह चालवतात. भगवान रामलल्लांच्यासाठी काहीतरी विशेषत आपल्या हातून घडावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यातून त्यांना असा लाडू निर्माण करण्याची कल्पना सुचल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Advertisement

या लाडूमध्ये कित्येक किलो सुकामेवा, बदाम आणि काजू घातलेले आहेत. या बदाम आणि काजूंचा उपयोग करुन लाडूच्या दर्शनी भागावर ‘जय श्रीराम’ असे आरेखन करण्यात आले आहे. हा लाडू बनविण्याठी त्यांना चार दिवस लागले. इतका मोठा लाडू वळून गोल करणे सोपे नव्हते. पण प्रभू रामचंद्रांनीच हा उपक्रम यशस्वी करण्यास आवश्यक बळ दिले, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले आहेत. त्यांचा हा विशाल लाडू प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आगळे वैशिष्ट्या ठरणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article