महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वडिलांसह 12 नातलगांची बंदुकधाऱ्याकडून हत्या

06:22 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इराणमधील थरारक घटना : कौटुंबिक वादातून कृत्य

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

Advertisement

इराणमध्ये एका 30 वषीय व्यक्तीने सामूहिक गोळीबारात आपल्या वडिलांसह एकूण 12 नातेवाईकांची हत्या केली. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गोळीबारासाठी आरोपीने असॉल्ट रायफलचा वापर केल्याचे सांगण्यात आले. इराणमधील दुर्गम ग्रामीण भागात घडलेली गोळीबाराची ही घटना काही दशकांतील सर्वात प्राणघातक असल्याचेही सांगण्यात आले.  कौटुंबिक वादातून एका गावात पहाटेच्या सुमारास बंदुकधारी व्यक्तीने आपले वडील, भाऊ आणि इतर नातेवाईकांवर गोळीबार केल्याचे केरमन प्रांताच्या न्याय विभागाचे प्रमुख इब्राहिम हमीदी यांनी सांगितले. यात एकूण 12 जणांना जीव गमवावा लागला असून इराणमधील कोणत्याही कौटुंबिक हिंसक घटनेतील मृत्यूची ही सर्वाधिक संख्या असल्याचेही ते पुढे म्हणाले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#international
Next Article