कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानचे 12 सैनिक स्फोटात ठार

07:00 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बलुचिस्तानात मोठा हल्ला : रिमोट बॉम्बने उडविले सैन्यवाहन

Advertisement

भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तान सैन्यावर आणखी एक संकट ओढवले आहे. आता बलुचिस्तानात सशस्त्र सदस्यांनी पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला केला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला करत सैन्य वाहन नष्ट केले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे 12 सैनिक ठार झाले आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने बोलन खोऱ्याच्या मच कुंडनजीक हा हल्ला घडवून आणला. बोलन खोऱ्यातच मार्च महिन्यात बलुच संघटनेने जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले होते. पाकिस्तानी सैन्याला रेल्वेगाडीवर नियंत्रण मिळविण्यास 36 तासांपेक्षा अधिक कालावधी लागला होता. पाकिस्तानी सैनिक गस्त घालत असताना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या विशेष सामरिक ऑपरेशन पथकाने रिमोट कंट्रोल आयईडी स्फोटाद्वारे सैनिकांच्या वाहनाला लक्ष्य केले. स्फोटाचा व्हिडिओ बीएलएशी संबंधित हक्काल मीडियाने जारी केला आहे. मृतांमध्ये पाकिस्तानी सैन्याचा स्पेशल ऑपरेशन कमांडर देखील सामील आहे. बलुचिस्तानात मागील काही महिन्यांमध्ये सशस्त्र संघटनांनी आंदोलन तीव्र केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article