महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बसवर डंपर उलटल्याने 12 भाविकांचा मृत्यू

10:00 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तर प्रदेशातील दुर्घटना 

Advertisement

शाहजहानपूर : उत्तर प्रदेशमधील शाहजहानपूर येथे शनिवारी रात्री खडीने भरलेला डंपर प्रवासी बसवर उलटल्याने मोठा अपघात घडला. या दुर्दैवी घटनेत उत्तराखंडमधील पूर्णागिरी मंदिराकडे निघाले ल्या सहा महिला आणि तीन मुलांसह एकूण बारा भाविकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दुर्घटनेत इतर नऊ यात्रेकरू गंभीर जखमी झाले असून त्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सर्व पीडित सीतापूर जिल्ह्यातील कमलापूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी शनिवारी संध्याकाळी 6 वाजता देवदर्शन प्रवास सुरू केला होता. खुटार पोलीस स्थानक हद्दीतील हाजियापूर गावात हा अपघात झाल्याचे शाहजहानपूरचे पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीना यांनी सांगितले. सीतापूरहून 59 प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस मंदिराकडे जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयात थांबली होती. काही भाविक जेवणासाठी खाली उतरले होते, तर काही बसच्या आत थांबले होते. अचानक खडी वाहून नेणाऱ्या डंपरचा ताबा सुटल्याने तो बसवर उलटला. यात 12 भाविकांना प्राणास मुकावे लागले. स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी बसमधील काही प्रवाशांची सुटका केली. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat
Next Article