तीन वर्षात पॅचवर्कचे 12 कोटी खड्यात
शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय
पॅचवर्कचे काम वडापच
नागरीकांची हाडे खिळखिळी
कोल्हापूर
पावसाळ्यात दरवर्षी पॅचवर्कसाठी महापालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपयांची तरतुद करण्यात येते. यंदाही 3 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली. यापैकी 3 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे 3 कोटी रुपये अक्षरश: खड्यात गेल्याचे चित्र शहरातील रस्त्याच्या स्थितीवरुन दिसत आहे. महापालिकेने गेल्या तीन वर्षात 12 कोटी रुपयांचा निधी केवळ पॅचवर्कसाठी खर्च केला असून, काही ठराविक ठेकेदारांना पोसण्याचे काम महापालिका करत असल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर शहराची लोकसंख्या 7 लाखाच्या जवळपास असून, क्षेत्रफळ 66.82 किलोमीटरमध्ये विस्तारले आहे. शहरात सुमारे 1 हजार 35 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यात आयआरबीने केलेले रस्ते 49.99 कि.मी., नगरोत्थान योजनेतील रस्ते 39 कि.मी., लिंक रोडमधून झालेले रस्ते 16 कि.मी. यांचा समावेश आहे. इतर रस्ते आमदार, खासदार निधीबरोबरच महापालिका निधी व नगरसेवकांच्या ऐच्छिक निधीतून तयार करण्यात आले आहेत. शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर खड्डे आहेत की खड्यात रस्ते आहेत असा प्रश्न नागरीकांना पडत आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अपघातामुळे काही जणांचा बळी गेला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाची साधने मर्यादीत असल्यामुळे आर्थिक स्थिती नुसार महापालिकेचा भर पॅचवर्कवर असतो. पॅचवर्कही अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. परिणामी, पॅचवर्कच्या नावावर महापालिकेची उधळपट्टी सुरू असून, ठराविक कंत्राटदारांना पोसण्याचे काम सुरु आहे.
पॅचवर्क, रिस्टोरेशन म्हणजे ठेकेदारांना चरण्याचे कुरण
पॅचवर्क आणि रिस्टोरेशन म्हणजे ठेकेदारांना चरण्यासाठी कुरण ठरत आहे. दरवर्षी खड्डे आणि त्याचे पॅचवर्क तसेच रिस्टोरेशन निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य, असे चित्र शहराचे झाले आहे. महापालिकेच्या कामासाठी दोनशेच्यावर ठेकेदारांचे रजिस्ट्रेशन आहे. मात्र, फक्त आठ ते दहा ठेकेदारांनी साखळी तयार केली आ एकमेकांतच ते वाटून कामे घेत आहे त्यामुळे वाटेल तसे कामांचे वडाप के जात आहे. गेल्या काही महिन्य सुमारे 8 ते 10 कोटींचे रिस्टोरेश झाले आहे. मात्र, ओबडधो रिस्टोरेशनमुळे रस्त्यांची अक्षरश? व लागली आहे.
नागरीकांची हाडे खिळखिळी
महापालिकेच्या बजेटमध्ये दरवर्षी रस्त्यांवरील पॅचवर्कसाठी कोट्यावधी रुपये अपेक्षित धरण्यात येतात. विशेष म्हणजे दरवर्षी पॅचवर्कवर ही रक्कम खर्ची पडते. मात्र, खड्डे तसेच राहतात; मग प्रशासन पॅचवर्क करते तरी कुठे आणि कशाचे? असा प्रश्न निर्माण होतो. परिणामी, पॅचवर्कसाठीची रक्कम खड्यात जात आहे. गेल्या सहा वर्षांत पॅचवर्कचे वडाप करून तब्बल 12 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातून ठेकेदार गब्बर बनले आहेत. मात्र, खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे कोल्हापूरवासीयांची हाडे खिळखिळी होत आहेत.
मुदतीमधील रस्त्यांचे काय
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांचा आढावा घेतला होता. यामध्ये जवळपास 400 रस्ते मुदतीमध्ये असल्याचे समोर आले होते. या रस्त्यांची नावे महापालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार होते. मात्र मुदतीमधील या रस्त्यांचे काय झाले असा प्रश्न आता पडत आहे. मुदतीमध्ये असणारे बहुतांशी रस्त्यांवर आता खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराकडे आहे, मात्र या कडे दुर्लक्ष केले जात आहे.
पॅचवर्कचे काम वडाप
पॅचवर्कचा ठेका देताना महापालिकेकडून दरवर्षी अटी व शर्थी घालण्यात येतात. मात्र याचे पालन ठेकेदारांकडून होत नाही. मुरुमाच्या जागी माती वापरुन या मातीवरच डांबर ओतण्याचा प्रकार सर्रास केला जात आहे. याचसोबत शहरातील काही ठराविक रस्त्यांवरच पॅचवर्क करुन निम्मेच काम करुन पुर्ण पैसे उकळल्याचेही दिसून येत आहे.
चौकट
वर्ष निधी
2021 -22 3 कोटी 60 लाख
2022- 23 3 कोटी 30 लाख
2023 - 24 3 कोटी 60 लाख