महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उद्घाटनापूर्वीच कोसळला 12 कोटीचा पूल

05:55 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बिहारच्या अररिया येथील धक्कादायक प्रकार

Advertisement

वृत्तसंस्था/ अररिया

Advertisement

बिहारच्या अररिया जिल्ह्यातील बकरा नदीत उभारण्यात आलेला पूल मंगळवारी कोसळला आहे. बकरा नदीवरील या पूलाचे लवकरच उद्घाटन केले जाणार होते, परंतु त्यापूर्वीच सुमारे 12 कोटी रुपये खर्चुन निर्माण करण्यात आलेला हा पूल कोसळला आहे. या घटनेनंतर आता पूलाच्या निर्मितीकार्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पूलाचे 3 पिलर मंगळवारी नदीत सामावल्याने पूल कोसळला. पूल उभारणीचे काम करणाऱ्या एजेन्सीचे पदाधिकारी तसेच प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. या अधिकाऱ्यांनी या घटनेप्रकरणी प्रतिक्रिया देणे तूर्तास टाळले आहे.

अररिया जिल्ह्याच्या ग्रामीण कार्य विभागाकडून हा पूल उभारण्यात आला होता. या पूलाला मुख्य रस्त्याशी जोडणारा रस्ता अद्याप तयार करण्यात आला नव्हता. सुमारे 12 कोटी रुपयांच्या निधीद्वारे सुमारे 100 मीटर लांबीचा हा पूल उभारण्यात आला होता. या पूलाची निर्मिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने याचे उद्घाटन झाले नव्हते.

बिहारमध्ये मागील वर्षी जून महिन्यात सुल्तानगंजमध्ये गंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पूलाचे हिस्से कोसळले हेते. यानंतर मार्च महिन्यात सुपौल येथे कोसी नदीवर उभारण्यात येणाऱ्या पूलाचा स्लॅब कोसळला होता. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article