For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कबनूरमध्ये 12 एकरातील ऊस भस्मासात; शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय

12:38 PM Dec 14, 2023 IST | Abhijeet Khandekar
कबनूरमध्ये 12 एकरातील ऊस भस्मासात  शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय
sugarcane incinerated in Korochi
Advertisement

कबनूर वार्ताहर

इचलकरंजी कोल्हापूर रस्त्यावरील कबनूर ओढ्या जवळून गेलेल्या बायपास रस्त्या लगतच्या सुमारे बारा एकरातील ऊस आगीमध्ये भस्मसात झाला. शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

कबनूर ता. हातकणंगले येथील ओढ्यानजीक मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास पंचगंगा साखर कारखान्याला जाणाऱ्या रस्त्याजवळील ऊसाच्या फडास आग लागली. बघता बघता आग पसरली. आगीने रौद्ररूप धारण केले होते.पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या दोन अग्निशमन गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.पण आगीच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने अग्निशामक दलाच्या व्यक्तींना आग विझवण्यासाठी मर्यादा पडल्या.परिसरातील शेतक्रयांनी आग विझवण्यासाठी मदत केली.दोन तासाने आग आटोक्यात आली.या आगीत जयकुमार कोले, सुभाष कोले, अण्णासो निंबाळकर या शेतक्रयांच्या सुमारे बारा एकर शेतीतील ऊस भस्मसात झाला. त्यामुळे लाखो रुपयांचे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Advertisement
Advertisement

.