महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कार्तिकी पंढरपूर यात्रेसाठी एसटीच्या 115 जादा बस

05:02 PM Nov 09, 2024 IST | Radhika Patil
115 additional ST buses for Kartiki Pandharpur Yatra
Advertisement

मागणी केल्यास थेट गावातून बस मिळणार

Advertisement

कोल्हापूर : 
कार्तिकी पंढरपूर यात्रा 12 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. या निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशींच्या सोयीसाठी 11 ते 13 नोव्हेंबर रोजी एसटीच्या कोल्हापूर विभागाने 115 जादा बसेसचे नियोजन केले आहे.

Advertisement

कार्तिकी पंढरपूर यात्रेकरीता 44 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करुन बसची मागणी केल्यास त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी त्यांचे गावातून थेट यात्रेच्या ठिकाणी आणि परत गावापर्यंत अशी जादा बस उपलब्ध करुन दिली जाईल. या प्रवासात देखील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना मोफत प्रवास, महिलांसाठी महिला सन्मान योजना अंतर्गत तिकीट दरात 50 टक्के सवलत यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. त्यासाठी आपल्या जवळच्या आगार/बसस्थानकावरील दूरध्वनीवर संपर्क साधावा अथवा प्रत्यक्ष भेटून चौकशी करावी, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article